Share Market Closing: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Share Market Closing Today: मंगळवारी (22 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 309 अंकांनी घसरून 24,472 वर बंद झाला. सेन्सेक्स 930 अंकांनी घसरून 80,220 वर बंद झाला.
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 22 October 2024: मंगळवारी (22 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 309 अंकांनी घसरून 24,472 वर बंद झाला. सेन्सेक्स 930 अंकांनी घसरून 80,220 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 705 अंकांनी घसरून 51,257 वर बंद झाला.

मिडकॅपमध्ये 1500 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याच वेळी, स्मॉलकॅप निर्देशांक देखील 700 अंकांच्या घसरणीसह 18700 च्या खाली गेला. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.