Share Market Closing Latest Update 11 September 2024: शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही जवळपास 100 अंकांनी घसरला. बँक निफ्टीही जवळपास 150 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
निफ्टीवरील बहुतांश निर्देशांकांमध्येही घसरण दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 398 अंकांच्या घसरणीसह 81,523 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 123 अंकांच्या घसरणीसह 24,918 अंकांवर बंद झाला.