Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; बँक निफ्टीत मोठी वाढ, BSE शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले

Share Market Closing Today: शेअर बाजारांनी आज (16 सप्टेंबर) विक्रमी उच्चांक गाठला. बाजार बंद होताना चांगल्या वाढीसह बंद झाला. आज निफ्टीने 25,445 च्या विक्रमी पातळीला तर सेन्सेक्सने 83,184 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला.
Share Market Closing
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 16 September 2024: शेअर बाजारांनी आज (16 सप्टेंबर) विक्रमी उच्चांक गाठला. बाजार बंद होताना चांगल्या वाढीसह बंद झाला. आज निफ्टीने 25,445 च्या विक्रमी पातळीला तर सेन्सेक्सने 83,184 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. बंद होताना निफ्टी 27 अंकांनी वाढून 25,383 वर बंद झाला.

सेन्सेक्स 97 अंकांनी वाढून 82,988 वर आणि निफ्टी बँक 215 अंकांनी वाढून 52,153 वर बंद झाला. बँक निफ्टीने तेजी दाखवली आणि मिडकॅप निर्देशांकानेही चांगली कामगिरी केली. मेटल आणि पॉवर शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

Share Market Today
Share Market Closing Sakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.