PI Industries Interim Dividend : लार्ज कॅप कंपनी पीआय इंडस्ट्रीजच्या (PI Industries) बोर्ड ऑफ डायरेक्टरने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 450 टक्के म्हणजेच 4.5 रुपये प्रति शेअर इक्विटी शेअर्सवर अंतरिम डिव्हिडेंड (Interim Dividend) जाहीर केला आहे.
हा डिव्हिडेंड 15 मार्च 2023 किंवा त्याआधी दिला जाईल. एलिजिबल मेंबर्स निश्चित करण्याच्या उद्देशाने 24 फेब्रुवारी 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पीआय इंडस्ट्रीज ही सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनची लार्ज कॅप कंपनी आहे, जी कमोडिटी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.
गेल्या 75 वर्षांमध्ये, कंपनीने अनेक आयकॉनिक ब्रँड तयार केले आहेत आणि 70,000 रिटेल लोकेशन्सवर त्यांचे नेटवर्क पसरले आहे. कंपनी केमिस्ट्री आणि इंजिनिअरिंगमधील टेकनिकल कौशल्यासाठी ओळखली जाते.
पीआय इंडस्ट्रीजच्या शेअर्सने एका वर्षात त्यांनी सुमारे 32 टक्के परतावा दिला आहे. पण, सहा महिन्यांत स्टॉक जवळजवळ फ्लॅट राहिला. पण मागच्या काही दिवसांत त्याने जवळपास सहा टक्के परतावा दिला आहे.
शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे 17 फेब्रुवारीला बीएसईवर 2.59 टक्क्यांनी घसरून हा शेअर 3,287 रुपयांवर आला आहे.
कंपनीचा तिमाही निकाल :
डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत पीआय इंडस्ट्रीजची कंसोलिडेटेड सेल्स 18.94 टक्क्यांनी वाढून 1,613.20 कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,356.30 कोटी होता.
त्याच वेळी, चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसर्या तिमाहीत, कंपनीचा एबिटदा मागील वर्षीच्या याच तिमाहीत 296.80 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक 40 टक्क्यांनी वाढून 415.6 कोटी रुपयांवर पोहोचला.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.