Opening Bell : नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये नगण्य वाढ

Share Market : आज शेअर मार्केट सुरू होताना सेन्सेक्स 66,532.98 अंकांवर होता.
Opening Bell Today
Opening Bell TodayeSakal
Updated on

Share Market Today : नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात सपाट ओपनिंग पहायला मिळाली. आज (1 ऑगस्ट) व्यवहार सुरू होताना सेन्सेक्स केवळ 5 अंकांनी, तर निफ्टी 30 अंकांनी वर गेले होते.

शेअर मार्केट सुरू होताना आज सेन्सेक्स 66,532.98 अंकांवर होता. तर, निफ्टी 19,784 अंकांवर उघडले. सेन्सेक्सच्या 30 पैकी 19 शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली, तर 11 शेअर्स रेड मार्कवर होते. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्समध्ये तेजी आणि 19 शेअर्समध्ये मंदी दिसून आली.

Opening Bell Today
Share Market Investment: 20 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्याधीश, आता एका डीलमुळे शेअर्स तेजीत

आज सकाळच्या सत्रात जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि अल्ट्राटेक सिमेंट हे टॉप गेनर्स होते. तर, पॉवरग्रिड, मारुती, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे टॉप लूजर्स ठरले. (Share Market Today)

सेक्टोरल इंडेक्स

आज फायनॅन्शिअल सर्व्हिस आणि रिअल्टी इंडेक्स वगळता सर्व क्षेत्रांमध्ये तेजी दिसून येत आहे. आयटी इंडेक्समध्ये 0.62 टक्के वाढ दिसून आली, तर ऑटो शेअर्स 0.45 टक्के तेजीत आहेत. मेटल शेअर्समध्येही 0.42 टक्के वाढीसह व्यवहार सुरू आहेत.

Opening Bell Today
Share Market Investment: 'या' NBFC शेअरने गाठला विक्रमी उच्चांक, आणखी तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.