Share Market Opening : शेअर बाजाराची तेजीत सुरूवात; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये काही अंकांची वाढ

Opening Bell Today : सोमवारी तेजीत बंद झालेल्या शेअर मार्केटची आज तेजीतच सुरूवात झाली.
Share Market Opening Bell Today
Share Market Opening Bell TodayeSakal
Updated on

सोमवारी तेजीमध्ये बंद झालेलं शेअर मार्केट आज (5 सप्टेंबर) सकाळी देखील तेजीमध्ये उघडलं. व्यवहाराची सुरुवात होताना सेन्सेक्स 119.17 अंकांनी वधारून 65,747.31 अंकांवर उघडला. तर निफ्टीदेखील 39.15 अंकांच्या वाढीसह 19,567.95 अंकांवर उघडला.

आज सकाळच्या सत्रामध्ये टायटन, बजाज फायनान्स, एल अँड टी, टाटा मोटर्स आणि ITC हे टॉप गेनर्स राहिले. तर, JWS स्टील, भारती एअरटेल, टाटा स्टील, मारुती आणि ICICI बँक हे टॉप लूजर्स राहिले.

दरम्यान, सोमवारी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 274.06 अंकांनी वधारला होता, तर निफ्टीमध्येही 102.15 अंकांची वाढ झाली होती. अमेरिकेमध्ये लेबर डे असल्यामुळे तिथले शेअर मार्केट बंद होते. तर आशियाई शेअर मार्केटमध्येही काही प्रमाणात तेजी दिसून आली होती.

Share Market Opening Bell Today
Top Shares Today: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.