Share Market Opening: शेअर बाजारात तेजी सुरुच, सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर; कोणते शेअर्स चमकले?

Share Market Opening: सेन्सेक्सने 250 हून अधिक अंकांच्या वाढीसह सुरुवात केली.
Share Market Opening latest updates in marathi Nifty scales fresh peak of 20,956.55; Sensex at 69,614.04 6 december 2023
Share Market Opening latest updates in marathi Nifty scales fresh peak of 20,956.55; Sensex at 69,614.04 6 december 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 6 December 2023: बुधवारी आठवडयातील तिसऱ्या व्यवहारात बाजाराने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकामध्ये सतत वाढ होत असून दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी पातळी गाठली आहे.

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि भाजपच्या दणदणीत विजयानंतर शेअर बाजारात तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने 250 हून अधिक अंकांच्या वाढीसह सुरुवात केली आणि निफ्टी 50 निर्देशांक 70 अंकांच्या वाढीसह उघडला.

अदानी शेअर्सची स्थिती

अदानी समूहाचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्स उघडल्यानंतर NSE वर 4.50 टक्क्यांनी वाढला आहे. NSE वर अदानी एंटरप्रायझेसमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये सुमारे 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.

बँक निफ्टीमधील तेजीचा कल कायम राहिला आणि सुरुवातीच्या काळात विक्रमी उच्चांक गाठला. यानंतर काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आली. बँक निफ्टी आज 47,256 वर उघडला. बँक निफ्टीच्या 12 पैकी 5 शेअर्स वाढले आहेत आणि 7 शेअर्स घसरले आहेत.

Share Market Opening latest updates in marathi Nifty scales fresh peak of 20,956.55; Sensex at 69,614.04 6 december 2023
Adani Group: शेअर बाजाराच्या तेजीत अदानी समूहाचा मोठा वाटा, गुंतवणूकदारांनी कमावले 1.9 लाख कोटी

बजाज समूहाचे बाजार भांडवल 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. बाजारातील या वादळी तेजीत बजाज समूहाचे शेअर्सही तेजीत आहेत. आता रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा समूह, एचडीएफसी बँक आणि अदानी समूहानंतर अशी कामगिरी करणारा हा पाचवा समूह बनला आहे. 1 जानेवारीपासून बजाज समूहाचे एकूण बाजार मूल्य सुमारे 21 % वाढले आहे.

सुरुवातीच्या व्यापारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक सारख्या निर्देशांकांनी वाढ नोंदवली. शेअर बाजारात सर्वात जास्त वाढ अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये झाली.

Share Market Opening latest updates in marathi Nifty scales fresh peak of 20,956.55; Sensex at 69,614.04 6 december 2023
Forbes: निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 32व्या स्थानी, जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समावेश

सुरुवातीच्या व्यवहारात जिओ फायनान्शियल, महिंद्रा अँड महिंद्रा, कामधेनू लिमिटेड, स्टोव्ह क्राफ्ट, देवयानी इंटरनॅशनल, गती लिमिटेड, टाटा मोटर्स, एक्साइड इंडस्ट्रीज आणि पटेल इंजिनीअरिंग यांसारख्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर युनिपार्ट्स इंडिया आणि ओम इन्फ्रा यांचे शेअर्स घसरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.