Share Market Opening Latest Update 8 December 2023:
ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजार तेजीसह उघडला. RBI MPC च्या निर्णयामुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक खाली-वर होऊ शकतात. आशियाई आणि अमेरिकन शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत.
सकाळच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 102 अंकांनी वर होता आणि 69,652 च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 41 अंकांनी वर होता आणि 20942 च्या पातळीवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, अदानी एंटरप्रायझेस आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात तेजीसह व्यवहार करत होते, तर आयसीआयसीआय बँक, डॉ रेड्डीज, भारती एअरटेल आणि कोटक बँक यांचे शेअर्स घसरत होते.
शुक्रवारच्या व्यवहारात मल्टीबॅगर परतावा देणार्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात ओम इन्फ्रा, देवयानी इंटरनॅशनल, पटेल इंजिनीअरिंग, युनिपार्ट्स इंडिया, गती लिमिटेड आणि एक्साइड इंडस्ट्रीजचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.
रिझर्व्ह बँकेचे आर्थिक धोरण आणि अमेरिकेतील बिगर कृषी नोकऱ्यांच्या आकडेवारीवर गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. शेअर बाजाराची एकूण गती सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे कारण परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले आहेत, भारताचा जीडीपी आणि व्यवसायाचे आकडे चांगले येत आहेत आणि कंपन्यांच्या कमाईचे आकडे सुधारत आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) चे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने, कंपनीचे मार्केट कॅप गुरुवारी 5 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले.
मार्केट कॅपच्या बाबतीत ही सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. बीएसईमध्ये कंपनीचा शेअर 5.34 टक्क्यांनी वाढून 785.50 रुपयांवर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये शेअर 5.25 टक्क्यांच्या वाढीसह 785.15 रुपयांवर पोहोचला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.