Share Market Opening: शेअर बाजारात निवडणुकीचा जल्लोष; निफ्टी पहिल्यांदाच 20500 च्या पुढे; अदानी शेअर्समध्ये मोठी वाढ

Share Market Opening: आज सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली.
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty open at fresh record high 4 december 2023
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty open at fresh record high 4 december 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 4 december 2023: आज सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी दिसून आली. कारण जीएसटी संकलन, जीडीपी वाढीचे आकडे आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्रदीपक विजयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. GIFT निफ्टी 20600 च्या वर ट्रेड करत आहे.

आज शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडला. BSE सेन्सेक्स सुमारे 900 अंकांच्या वाढीसह 68,435 वर उघडला आणि निफ्टी पहिल्यांदा 20,601 वर उघडला. बाजाराला देशांतर्गत आणि जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे.

भाजपच्या विजयामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वाढले आहेत.

निफ्टीचा नवा विक्रम

प्री-ओपन सत्रात जोरदार वाढ झाल्यानंतर, भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी सकाळी 9.15 वाजता नवीन विक्रमी उच्चांकावर उघडला. निफ्टी 276.40 अंकांच्या किंवा 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 20,600 च्या पातळीवर उघडला.

निफ्टीवरील अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय आणि एल अँड टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty open at fresh record high 4 december 2023
Gold Rate Today: खरेदीदारांना झटका! लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ, काय आहे आजचा भाव?

सेन्सेक्स गेला 68000 च्या वर

दुसरीकडे बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 882.38 अंक किंवा 1.31 टक्क्यांच्या उसळीसह 68,363.57 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडताच जवळपास 2194 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 259 शेअर्स घसरणीसह उघडले, तर 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty open at fresh record high 4 december 2023
Share Market Today: भाजपच्या विजयाचा परिणाम शेअर बाजारावर दिसणार, ट्रेडिंग लिस्टमध्ये ठेवा हे 10 शेअर्स

विदेशी गुंतवणूकदारांकडून वाढत्या खरेदीमुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. गेल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 10593 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

तसेच GST मधून केंद्र सरकारचे उत्पन्न 15 टक्क्यांनी वाढले आहे, तर तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे शेअर बाजारात वाढ दिसून येत आहे. अमेरिकेत महागाई वाढीचे आकडे घसरले आहेत. नवीन वर्षात अमेरिकेतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक आणि आयटीसीचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. आज सुरुवातीच्या व्यवहारात, गौतम अदानी समूहाच्या सर्व नऊ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.