Share Market Opening Latest Update 12 September 2023: मंगळवारी सलग 8व्या दिवशी शेअर बाजाराने तेजी नोंदवली आहे. प्रमुख बाजार निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. NSE निफ्टी प्रथमच 20,100 च्या पुढे उघडला. BSE सेन्सेक्सही 67,539 वर पोहोचला.
बाजार विक्रमी उच्चांकावर
बाजारात L&T चा शेअर सुमारे 3.5 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर एफएमसीजी शेअर्सच्या विक्रीमुळे एचयूएल आणि नेस्लेचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सोमवारी भारतीय बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाले होते.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी
सुरुवातीच्या व्यापारात, लार्सन अँड टुब्रो (L&T) चे शेअर्स 3.05 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स वधारत होते.
त्याचप्रमाणे अॅक्सिस बँक, विप्रो, इन्फोसिस, सन फार्मा, एनटीपीसी, एचसीएल टेक, भारती एअरटेल, आयटीसी आणि एसबीआय या कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्समध्ये वाढ आणि 16 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
NSE IX वर, गिफ्ट निफ्टी 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 20,116 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून मंगळवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 280 अंकांची वाढ दिसून आली. त्याच वेळी निफ्टी 20,080 अंकांच्या वर व्यवहार करत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.