Share Market Opening: चौफेर खरेदीमुळे शेअर बाजाराला झळाळी, निफ्टीने ओलांडला 20,000 चा टप्पा

Share Market Opening: चौफेर खरेदीमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today all sectoral indices in green 29 November 2023
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today all sectoral indices in green 29 November 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 29 November 2023:

बुधवारी शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. चौफेर खरेदीमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्सने 350 अंकांच्या उसळीसह 66,500 चा टप्पा पार केला आहे.

निफ्टीनेही 120 अंकांच्या वाढीसह 20,000 चा टप्पा पार केला. बाजारात सर्वात मोठी वाढ मेटल, ऑटो आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 1.25 टक्क्यांनी वाढून सर्वाधिक वाढले आहेत.

कोणते शेअर्स वाढले?

NSE मधील टॉप गेनर्समध्ये, भारती एअरटेल, टेक महिंद्रा लिमिटेड, माइंड ट्री आणि विप्रोच्या शेअर्समध्ये तेजी होती. बायबॅकच्या वृत्तानंतर टीसीएसचे शेअर्स आज तेजीत आहेत. तर बीपीसीएल कोल इंडिया, पॉवर ग्रिड यांच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारादरम्यान घसरण नोंदवली गेली.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today all sectoral indices in green 29 November 2023
Share Market Today: मार्केटमध्ये चांगली कमाई करण्यासाठी 'हे' 10 निवडक शेअर्स ठेवा लिस्टमध्ये

जागतिक शेअर बाजारात अमेरिकेचा डाऊ जोन्स मंगळवारी रात्री 83.51 च्या वाढीसह बंद झाला. मंगळवारी डाऊ जोन्सने स्थिरता दाखवली आणि 83.51 अंकांच्या वाढीसह 35,416.98 च्या पातळीवर बंद झाला. नॅस्डॅकनेही वाढ नोंदवली.

आज सकाळपासून अमेरिकेचे डाऊ फ्युचर तेजीसह व्यवहार करत होते आणि GIFT निफ्टीही तेजीत आहे. यामुळे बाजाराची सुरुवात तेजीत होण्याचे संकेत मिळाले.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today all sectoral indices in green 29 November 2023
Gold At Record High: सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड, सोने सर्वकालीन उच्चांकावर

आशियाई बाजारात संमिश्र कल

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. GIFT NIFTY मध्ये 0.09 टक्के आणि Nikkei 225 मध्ये 0.13 टक्के वाढ दिसून आली आहे.

स्ट्रेट टाइम्समध्ये 0.42 टक्के वाढ झाली आहे तर हँग सेंगमध्ये 1.74 टक्के घट झाली आहे. कोस्पीमध्ये 0.14 टक्के आणि शांघाय कंपोझिटमध्ये 0.31 टक्के घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.