Share Market Opening Latest Update 18 October 2023: शेअर बाजारात गुरुवारी सुस्त सुरुवात झाली. प्रमुख बाजार निर्देशांक सपाट उघडले. BSE सेन्सेक्स 150 अंकांनी घसरून 66,300 च्या खाली आला आहे. निफ्टी देखील 30 अंकांनी घसरून 19,780 च्या जवळ व्यवहार करत आहे. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह निफ्टीमध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ?
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीपीसीएल, पॉवर ग्रिड, एसबीआय लाइफ आणि एचडीएफसी लाईफ या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, यूपीएल आणि इंडसइंड बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
बुधवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओम इन्फ्रा, कामधेनू लिमिटेड, पटेल इंजिनीअरिंग, जिओ फायनान्शिअल, देवयानी इंटरनॅशनल, युनी पार्ट्स आणि स्टोव्ह क्राफ्ट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, S&P BSE स्मॉल कॅप आणि निफ्टी IT मध्ये वाढ होत होती तर निफ्टी बँक थोड्या घसरणीसह व्यवहार करत होता.
बुधवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर, शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती.
आज या कंपन्यांचे निकाल होणार जाहीर
आज 18 ऑक्टोबर रोजी Wipro, IndusInd Bank, Bajaj Auto, LTIMindTree, बंधन बँक, ICICI Lombard General Insurance Company, IIFL Finance, 5Paisa Capital, Astral, Heritage Foods, Persistent Systems, Polycab India, RPG Life Sciences, Shoppers Stop, Tips In Titagarh Rail Systems, UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि वेलस्पन इन्व्हेस्टमेंट या कंपन्या त्यांचे निकाल जाहीर करतील.
जागतिक बाजारातून कमकुवत संकेत
जागतिक बाजारातून कमकुवत संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टीमध्येही थोडी घसरण दिसून येत आहे. काल अमेरिकन बाजार सपाट बंद झाले. दरम्यान, ब्रेंट क्रूडची किंमत 91 डॉलरच्या वर गेली आहे. आज आशियाई बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
GIFT NIFTY 20.00 अंकांची घसरण दर्शवत आहे. त्याच वेळी, Nikkei 31,974.29 च्या जवळपास 0.21 टक्क्यांनी घसरताना दिसत आहे. तर हँग सेंग 0.15 टक्क्यांनी घसरून 17,746.46 च्या पातळीवर दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.