जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक सपाट उघडले. BSE सेन्सेक्स 140 अंकांनी घसरून 63,700 च्या पातळीवर आला आहे. निफ्टीही 26 अंकांनी घसरून 19,050 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
खासगी बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर्सचा बाजारावर दबाव आहे. भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक नुकसान करणारे आहेत.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात लार्सन अँड टुब्रो, बीपीसीएल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये वाढ होत होती तर भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील, यूपीएल आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे.
निफ्टी मिड कॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ होत आहे तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकमध्ये किंचित घसरण झाली आहे.
फेडरल रिझर्व्ह बुधवारी चलनविषयक धोरण जाहीर करणार आहे, त्यामुळे बुधवारी सर्व आशियाई बाजारांमध्ये घसरण नोंदवली जात आहे. बाजारातील परिस्थिती निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी आव्हानात्मक असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अमेरिकेच्या रोखे बाजारातील उत्पन्नात वाढ आणि कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे बाजारात घसरण होत आहे.
निफ्टीच्या क्षेत्रीय निर्देशांकात, बँक, वित्तीय सेवा, मेटल, आरोग्य सेवा क्षेत्रात घसरण होत आहे. रिअल्टी शेअर्स 1.26 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑटो सेक्टरचे शेअर्स 0.30 टक्क्यांनी वधारत आहेत.
JSW स्टील 1.79 टक्क्यांनी आणि भारती एअरटेल 0.50 टक्क्यांनी घसरले आहेत. अॅक्सिस बँक 0.54 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.49 टक्के आणि पॉवर ग्रिड 0.45 टक्के घसरले आहेत. एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये 0.42 ची घसरण दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.