आज धनत्रयोदशीचा सण असून या दिवशी गुंतवणूकदार नवीन खरेदी करतात. मात्र आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असून त्याचा परिणाम सेन्सेक्स-निफ्टीच्या व्यवहारावर दिसून येत आहे.
शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह उघडला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरले. BSE सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि 64,650 च्या खाली आला. निफ्टीही जवळपास 50 अंकांनी घसरल्यानंतर 19,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज, एम अँड एम, टायटनचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत, तर ओएनजीसीचा शेअर सर्वाधिक वाढला आहेत.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे जेरोम पॉवेल आणि इतर अर्थतज्ज्ञांनी व्याजदर त्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचे मान्य केलेले नाही. त्यामुळे शेअर बाजारात काहीशी निराशा आहे.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, कोल इंडिया आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती, तर अदानी एंटरप्रायझेस, एचयूएल, अदानी पोर्ट्स आणि टाटा कंझ्युमरच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, निफ्टी मिड कॅप 100 घसरणीसह व्यवहार करत होता तर बीएसई स्मॉल कॅप किरकोळ तेजीत होता. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक देखील थोड्या घसरणीसह उघडले. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टीमधील 10 शेअर्समध्ये वाढ दिसून येत होती तर 40 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या नऊ पैकी चार कंपन्यांचे शेअर्स घसरले होते तर पाच शेअर्स किंचित वाढीने व्यवहार करत होते. अदानी पॉवरचा शेअर एक टक्क्याने वाढला आणि 404.65 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. अदानी विल्मरचे शेअर्स 1.1 टक्क्यांनी घसरले आणि 297 रुपयांवर व्यवहार करत होते.
शेअर बाजारातील मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर ओम इन्फ्राच्या शेअर्समध्ये तेजी होती. देवयानी इंटरनॅशनल, पटेल इंजिनिअरिंग, स्टोव्ह क्राफ्ट, गति लिमिटेड, एक्साइड इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा आणि युनी पार्ट्स इंडिया लिमिटेड यांचे शेअर्स घसरले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.