Share Market Opening: सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी; सेन्सेक्स 66,100 च्या वर, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening: सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 66,130 वर पोहोचला.
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Honasa, Welspun, TVS Motor in focus 23 November 2023
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Honasa, Welspun, TVS Motor in focus 23 November 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 23 November 2023:

गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह उघडले. BSE सेन्सेक्स 100 अंकांनी वाढून 66,130 वर पोहोचला. निफ्टीही 33 अंकांच्या उसळीसह 19,850 च्या जवळ व्यवहार करत आहे. बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील खरेदीला बाजाराला पाठिंबा मिळत आहे. निफ्टीमध्ये बजाज ऑटो 2% वाढीसह टॉप गेनर आहे.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात, गौतम अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह उघडले. अदानी विल्मारमध्ये सुमारे एक टक्का वाढ नोंदवली जात आहे.

मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांंमध्ये ओम इन्फ्रा लिमिटेड, स्टोव्ह क्राफ्ट, पटेल इंजिनिअरिंग, देवयानी इंटरनॅशनल, गति लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, कामधेनू लिमिटेड आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वाढले होते, तर यूनी पार्ट्स आणि जिओ फायनान्शिअलचे शेअर्स घसरत होते.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Honasa, Welspun, TVS Motor in focus 23 November 2023
Tax Evasion: सोशल मीडियावर वस्तू विकणाऱ्या कंपन्यांनी केली 10,000 कोटींची करचोरी; काय आहे प्रकरण?

अमेरिकन बाजार तेजीवर बंद

बुधवारी अमेरिकन बाजार तेजीत बंद झाले. बुधवारी डाऊ जोन्स 185 अंकांनी वधारला आणि 35,273.03 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ Composite 66 अंकांनी वाढून 14,265.86 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 18 अंकांनी वाढून 4556.62 च्या पातळीवर बंद झाला.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Honasa, Welspun, TVS Motor in focus 23 November 2023
RBI: मान्सून, कृषी क्षेत्र, महागाई आणि बँकांवर RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य, काय म्हणाले?

आशियाई बाजारात संमिश्र कल

आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. आशियाबद्दल बोलायचे झाले तर, GIFT NIFTY मध्ये 0.02 टक्के आणि Nikkei 225 मध्ये 0.29 टक्के वाढ झाली.

स्ट्रेट्स टाइम्समध्ये 0.05 टक्के आणि हँग सेंगमध्ये 0.31 टक्के घसरण होती. तैवान वेटेडमध्ये 0.23 टक्के घसरण होती, तर कोस्पीमध्ये सुमारे 0.07 टक्के घसरण दिसत आहे. शांघाय कंपोझिट 0.18 टक्क्यांनी वाढ झाली होती.

शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की निफ्टीला 19889 ची पातळी ओलांडणे कठीण होत आहे आणि असे दिसते की ख्रिसमसच्या आसपास निफ्टी 20000 ची पातळी गाठू शकेल. इंडिगो, मुथूट फायनान्स आणि टाटा कंझ्युमर या शेअर्समध्ये गुरुवारच्या व्यवहारात घसरण नोंदवली जाऊ शकते, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.