Share Market Opening Latest Update 17 October 2023: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह उघडले. BSE सेन्सेक्स 310 अंकांनी वाढून 66,500 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टीनेही 80 अंकांच्या वाढीसह 19,800 चा स्तर गाठला आहे.
निफ्टीच्या शेअर्सची स्थिती
निफ्टीमध्ये, 50 शेअर्सपैकी 46 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि केवळ 4 शेअर्समध्ये घसरण होत आहे. केवळ L&T, DV's Labs, ONGC आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये टाटा कंझ्युमर, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.
सेन्सेक्स शेअर्सची स्थिती
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ 3 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहे. L&T, TCS, TATA Motors शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. वाढत्या शेअर्समध्ये पॉवरग्रीड, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, विप्रो, आयसीआयसीआय बँक, एमअँच्डएम, आयटीसी, एसबीआय आणि एनटीपीसी हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तपासे म्हणाले, "मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 87 डॉलरच्या खाली आहेत"
कंपन्यांच्या चांगल्या कमाईच्या आकडेवारीमुळे शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, Gensol Engineering चे शेअर्स सुमारे 5.57 टक्क्यांनी वाढले होते, तर Jio Financial Services चे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 230 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.