Share Market Opening: अमेरिकन व्याजदर वाढीचा बाजारावर दबाव; आठवड्याची सुरुवात सुस्त, कोणत्या शेअर्सचे झाले नुकसान?

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली.
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Kotak Bank was the top loser with a fall of percent 23 October 2023
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Kotak Bank was the top loser with a fall of percent 23 October 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 23 October 2023: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. BSE सेन्सेक्स 65,400 च्या खाली घसरला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीने 19,500 चा टप्पा गाठला आहे. निफ्टीमध्ये कोटक बँकेचा शेअर 2% च्या घसरणीसह टॉप लूसर आहे. तर आयसीआयसीआय बँकेचा शेअर सर्वाधिक वाढला आहे.

कोणत्या शेअर्समध्ये वाढ?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ICICI बँक, Divi's Labs, बजाज फायनान्स, डॉ. रेड्डीज लॅब्स यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवली जात होती, तर कोटक महिंद्रा बँक, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि TCS शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती.

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स एक टक्क्याने वाढले होते. ICICI बँकेने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ICICI बँकेचा निव्वळ नफा 36 टक्क्यांनी वाढून 102.61 अब्ज रुपये झाला आहे.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Kotak Bank was the top loser with a fall of percent 23 October 2023
Investment : नव्या करप्रणालीतही गुंतवणूक आवश्‍यक
Share Market Opening 23 October 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Opening 23 October 2023 (S&P BSE SENSEX)Sakal

तज्ज्ञ काय सांगतात?

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोमवारी टोरेंट फार्मा, पीएनबी हाउसिंग फायनान्स, आलोक इंडस्ट्रीज, महिंद्रा हॉलिडेज, एनडीटीव्ही आणि महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअर्सवरही गुंतवणूकदार लक्ष ठेवतील कारण या सर्व कंपन्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत.

उदय कोटक यांच्या राजीनाम्यानंतर अशोक वासवानी यांना बँकेचे पुढील सीईओ बनवण्यात आल्याची घोषणा कोटक महिंद्रा बँकेने शनिवारी केली. या बातमीचा परिणाम शेअर बाजारातील कोटक महिंद्रा बँकेच्या कामकाजावर दिसू शकतो.

जागतिक बाजारात घसरण सुरूच

जागतिक बाजारात अजूनही घसरण सुरूच आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर शुक्रवारी अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Kotak Bank was the top loser with a fall of percent 23 October 2023
Adani Group: आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत गौतम अदानी, सिमेंटनंतर वीज क्षेत्रात करणार मोठी गुंतवणूक

डाऊ जोन्समध्ये सरासरी 0.86 टक्क्यांची घसरण झाली. त्याच वेळी, नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्समध्ये 1.53 टक्के आणि S&P 500 मध्ये 1.26 टक्के घसरण झाली. आजच्या व्यवहारात आशियाई बाजारही घसरणीसह व्यवहार करत आहेत. जपानचा निक्केई 0.81 टक्के, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.72 टक्क्यांनी घसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.