Share Market Opening: शेअर बाजारात जोरदार घसरण; सेन्सेक्स 400 अंकांनी खाली, निफ्टीची काय स्थिती?

Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण बुधवारीही कायम आहे.
Share Market
Share Market Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 4 October 2023: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण बुधवारीही कायम आहे. बुधवारी व्यवहार सुरू होताच देशांतर्गत बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्सने सुमारे 400 अंकांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली, तर निफ्टी उघडताच सुमारे 135 अंकांनी घसरला.

सेन्सेक्स 400 अंकांच्या घसरणीसह 65,075 अंकांवर पोहोचला. त्याच वेळी, निफ्टी 135 अंकांपेक्षा अधिक घसरला होता आणि 19,400 अंकांच्या खाली व्यवहार करत होता. अमेरिकन शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमुळे भारत आणि इतर आशियातील शेअर बाजारांवर परिणाम होत आहे.

Share Market
Share Market Today: शेअर बाजारात इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

सेन्सेक्स निफ्टीवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास सर्वच मोठे शेअर्स घसरले आहेत. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स रेड झोनमध्ये होते. नेस्ले इंडियाचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले होते. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एशियन पेंट्सचे शेअर्स किरकोळ वाढले.

तर एनटीपीसी 3.25 टक्के आणि अॅक्सिस बँक 2 टक्क्यांनी घसरले. मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि पर्वग्रिड सारखे शेअर्स 1.50-1.50 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले.

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात, अदानी समूहाच्या अदानी विल्मर आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली, तर उर्वरित सात कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.

Share Market Opening 4 October 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Opening 4 October 2023 (S&P BSE SENSEX)Sakal
Share Market
Penalty on LIC: आयकर विभागाने LICला ठोठावला 84 कोटी रुपयांचा दंड, काय आहे कारण?

जागतिक बाजारात काय परिस्थिती?

मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. वॉल स्ट्रीटचे प्रमुख निर्देशांक डाऊ जॉन्स, S&P आणि Nasdaq मोठ्या घसरणीसह बंद झाले.

डाऊ जोन्स इंडस्ट्रियलसाठी मार्चनंतरचा मंगळवार हा सर्वात वाईट दिवस ठरला. अमेरिकेचे तीनही प्रमुख निर्देशांक मंगळवारी एक टक्क्याहून अधिक घसरणीसह बंद झाले.

डाऊ जॉन्स इंडस्ट्रियलने 2023 मधील नीचांकी पातळी गाठली आहे. रोख्यांच्या वाढत्या विक्रीमुळे मंगळवारी अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.