Share Market Opening: शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण; सेन्सेक्स 64,000 च्या खाली, निफ्टीची काय स्थिती?

Share Market Opening: जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात झाली.
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Nestle, Tech Mahindra, And Car Trade In Focus 26 October 2023
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Nestle, Tech Mahindra, And Car Trade In Focus 26 October 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 26 October 2023:

कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक सलग सहाव्या दिवशी घसरणीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला आणि 63,650 च्या खाली आला.

त्याचप्रमाणे निफ्टीही 120 अंकांनी घसरून 19,000 च्या पातळीवर पोहोचला आहे. मेटल आणि सरकारी बँकिंग क्षेत्रातील शेअर्स घसरणीत आघाडीवर आहेत. याआधी बुधवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय बाजारात विक्रीची नोंद झाली.

Share Market Opening 26 October 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Opening 26 October 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

BSE सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत तर ऍक्सिस बँकेचा फक्त एक शेअर 1.20 टक्क्यांच्या वाढीसह तेजीसह व्यवहार करत आहे. टेक महिंद्रामध्ये सर्वाधिक 3.13 टक्के घसरण दिसून येत आहे.

कोल इंडिया लिमिटेड, टाटा स्टील, हिंदाल्को आणि टाटा कंझ्युमर यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स शेअर बाजारातील टॉप लूजर्सच्या यादीत समाविष्ट होते. शेअर बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स घसरणीसबृह व्यवहार करत होते.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

जर आपण निफ्टीच्या शेअर्सवर नजर टाकली तर 50 शेअर्सपैकी 49 शेअर्स घसरले आहेत आणि फक्त एक शेअर वाढीसह व्यवहार करत आहे. केवळ अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये 1.28 टक्क्यांची वाढ झाली आहे. निफ्टीचा टॉप लूसर अदानी एंटरप्रायझेस सुमारे 3 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Nestle, Tech Mahindra, And Car Trade In Focus 26 October 2023
Bank Holidays November 2023: सणासुदीत बँकांना असणार 'एवढ्या' दिवस सुट्या, पाहा संपूर्ण यादी

शेअर बाजारात घसरण का होत आहे?

यूएस मध्ये बाँड उत्पन्न 5 च्या जवळ, Nasdaq 300 अंकांनी घसरला. कोरोनानंतर, गुगलच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आणि तो सुमारे 10% घसरला. डॉलरचा निर्देशांक पुन्हा वाढत आहे, उदयोन्मुख बाजारांवर दबाव दिसून येत आहे. इस्राइल-गाझा युद्ध लांबण्याची शक्यता आहे.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Nestle, Tech Mahindra, And Car Trade In Focus 26 October 2023
SEBI Action: सेबीने 'बाप ऑफ चार्टवर' घातली बंदी, 17 कोटी रुपये परत करण्याचे दिले आदेश

भारतीय देशांतर्गत कंपन्यांचे निकाल उत्कृष्ट आहेत. आयसीआयसीआय बँकेनंतर अॅक्सिस बँकेचे निकालही चांगले आले. एशियन पेंट्सच्या निकालाची आज बाजार वाट पाहत आहे. चांगले परिणाम असूनही शेअर्समध्ये तेजी दिसत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.