जागतिक बाजारातील स्थिर संकेतांदरम्यान गुरुवारी (16 नोव्हेंबर) देशांतर्गत शेअर बाजार सपाट उघडला. सेन्सेक्स 65,665.87 वर आणि निफ्टी 19,674.70 वर उघडला.
बाजार उघडताच ही घसरण वाढली. सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्स 100 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी 25 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. बजाज फायनान्सच्या शेअर्सचे सेन्सेक्समध्ये सर्वात जास्त नुकसान झाले. बँक, वित्तीय सेवा आणि मेटल शेअर्समध्ये विक्री होत आहे.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 21 शेअर्स घसरत आहेत. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 15 शेअर्स वाढ दर्शवित आहेत तर 35 शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्स सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्सपैकी एनटीपीसी 1.70 टक्के आणि टीसीएस 0.71 टक्क्यांनी वर आहे. टाटा मोटर्स 0.46 टक्क्यांनी, M&M आणि IndusInd बँक 0.42 टक्क्यांनी वर आहेत.
बँक निफ्टी 22.80 अंकांच्या घसरणीनंतर 44178 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. क्षेत्रीय निर्देशांकात, तेल आणि वायू क्षेत्रामध्ये थोडीशी वाढ झाली आहे आणि ती 0.89 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक 0.56 टक्क्यांची घसरण दिसून आली. ऑटो, आयटी, मीडिया, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रात वाढीची चिन्हे दिसत आहेत.
बजाज फायनान्सवर आरबीआयने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम झाला आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. उघडण्याच्या वेळी, बजाज फायनान्स 3.93 टक्क्यांनी घसरून 6940 रुपयांच्या पातळीवर आला आहे.
बुधवारच्या वाढीनंतर गुरुवारच्या व्यवहारात शेअर बाजारात घसरणीची अपेक्षा होती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सावधगिरीने व्यापार करावा असा सल्ला तज्ञ देत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निफ्टी 19,500 च्या वर राहिल्यास शेअर बाजारातील वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.