Share Market Opening: चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात चमक; सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ

Share Market Opening: सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 64,670 वर पोहोचला आहे.
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Titan, IndusInd shine 6 November 2023
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Titan, IndusInd shine 6 November 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 6 November 2023:

चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार तेजीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह उघडले. बीएसई सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 64,670 वर पोहोचला आहे. निफ्टीही 100 अंकांच्या वाढीसह 19,300 च्या पुढे व्यवहार करत आहे.

बँकिंग, ऑटो, आयटी आणि इतर क्षेत्रातील खरेदीमुळे बाजार तेजीत आहे. निफ्टीमध्ये आयशर मोटरचा शेअर 1.25 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक वाढला आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. फक्त SBI चा शेअर घसरणीसह व्यवहार करत आहे. वाढत्या शेअर्समध्ये, अॅक्सिस बँक 1.16 टक्क्यांनी आणि L&T 1.10 टक्क्यांनी वाढत आहेत. नेस्ले 1.05 टक्‍क्‍यांनी तर ICICI बँक 1 टक्‍क्‍यांनी वर आहे. इंडसइंड बँक 0.83 टक्क्यांनी व एचसीएल टेक 0.80 टक्क्यांच्या वाढीसह दिसत आहे.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Titan, IndusInd shine 6 November 2023
अर्थभान : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

जागतिक शेअर बाजारातील वाढीमुळे सोमवारी निफ्टीचे कामकाज तेजीसह सुरू झाले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हने व्याजदर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे; अमेरिकेतील नोकऱ्यांची वाढ चांगली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर चांगले संकेत आहेत.

सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात अदानी समूहाच्या सर्व 9 सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स एक टक्क्याने वाढले तर एनडीटीव्ही आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सुमारे एक टक्क्यांनी वाढले.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Titan, IndusInd shine 6 November 2023
म्युच्युअल फंड : मल्टीअ‍ॅसेट गुंतवणुकीचा विचार का करावा?

अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये सर्वात कमी वाढ झाली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्‍या शेअर्समध्ये ओम इन्फ्रा, कामधेनू लिमिटेड, युनी पार्ट्स, स्टोव्ह क्राफ्ट, देवयानी इंटरनॅशनल, जिओ फायनान्शिअल या कंपन्यांचे शेअर्स वधारत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.