Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 64,300 जवळ, मेटल-पीएसयू बँकिंगमध्ये खरेदी

Share Market Opening: सेन्सेक्स 64,300 आणि निफ्टी 19,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today TVS Motor, Marico, DLF in focus 31 October 2023
Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today TVS Motor, Marico, DLF in focus 31 October 2023 Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 31 October 2023: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 64,300 आणि निफ्टी 19,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

बाजारातील तेजीमुळे रियल्टी, पीएसयू बँकिंग आणि मेटल सेक्टरमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. निफ्टीमध्ये हिंदाल्कोचा शेअर सर्वाधिक वाढला आहे. तर निकालानंतर यूपीएलचे शेअर्स घसरले आहेत.

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक किरकोळ वाढले. मंगळवारी शेअर बाजाराच्या प्री-ओपन सत्रात सेन्सेक्समध्ये 330 अंकांची वाढ दिसून आली तर निफ्टी 19,230 च्या पातळीवर पोहोचला होता.

कच्च्या तेलाच्या किंमतीत तीन टक्के वाढ झाली आहे आणि ती प्रति बॅरल 82.50 डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. मंगळवारी जगभरातील शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही कॅनरा बँक, इंडियन हॉटेल, पीएनबी आणि कोल इंडियाच्या शेअर्समधून कमाई करू शकता.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today TVS Motor, Marico, DLF in focus 31 October 2023
Muhurat Trading 2023: दिवाळीतही नफा कमावण्याची सुवर्णसंधी, 'या' दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग, असा आहे इतिहास

बँक निफ्टीने आज 43,356 चा उच्चांक गाठला होता पण आता सकाळी 9.30 वाजता तो दिवसभराच्या उच्चांकावरून 257 अंकांनी घसरून 43,102 च्या पातळीवर दिसत आहे. अनेक बँकिंग शेअर्समध्ये तेजीचा कल कायम आहे आणि काही PSU बँक शेअर्समध्ये वाढ होत आहे.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढताना दिसले आणि 16 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. टाटा मोटर्स 1.25 टक्क्यांनी आणि बजाज फिनसर्व्ह 0.90 टक्क्यांनी वाढलेले सर्वात मोठे शेअर्स आहेत. नेस्लेचे शेअर्स 0.65 टक्के आणि टाटा स्टील 0.60 टक्क्यांनी वधारले आहेत.

Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today TVS Motor, Marico, DLF in focus 31 October 2023
Niti Aayog: 2047 मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलरची होईल

काल अमेरिकन बाजारात मोठी वाढ झाली

काल अमेरिकन बाजारांमध्ये वाढ दिसून आली आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेजने 511 अंकांच्या किंवा 1.58 टक्क्यांच्या उसळीसह 32,928 च्या पातळीवर बंद केला. याशिवाय नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्सही 146 अंकांनी किंवा 1.16 टक्क्यांनी वाढून 12,789 च्या पातळीवर बंद झाला. S&P 500 निर्देशांक 1.2 टक्क्यांनी वाढला आणि 4166 च्या पातळीवर बंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.