Share Market Opening Latest Update 27 September 2023:
कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. बीएसई सेन्सेक्स 130 अंकांच्या घसरणीसह 65,800 च्या जवळ आहे. त्याचप्रमाणे निफ्टी देखील सुमारे 40 अंकांनी घसरल्यानंतर 19,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
फाइनेंशियल आणि मेटल क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे. निफ्टीमध्ये टाटा स्टील, बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत, तर डॉ. रेड्डीजचे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण
सुरुवातीच्या व्यवहारात बहुतांश मोठे शेअर्स घसरले आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स तेजीत आहेत, तर 21 शेअर्स घसरले आहेत.
एल अँड टी, सन फार्मा, इंडसइंड बँक या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे. दुसरीकडे, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा यांसारखे शेअर्स घसरत आहेत.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी
शेअर बाजाराच्या सुरुवातीला डॉ. रेड्डीज लॅब्स, सिप्ला, एलटीआय माइंडट्री, डिव्हीज लॅब, एल अँड टी, सन फार्मा, इंडसइंड बँकेचे शेअर्स तेजीत होते.
अमेरिकन बाजारात घसरण सुरूच
मंगळवारी डाऊ जोन्सची सरासरी 1.14 टक्क्यांनी घसरण झाली. तर Nasdaq कंपोझिट इंडेक्समध्ये 1.57 टक्के आणि S&P 500 इंडेक्समध्ये 1.47 टक्के घसरण दिसून आली.
बुधवारच्या व्यवहारात आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. दिवसभराच्या व्यवहारात जपानचा निक्केई 0.47 टक्क्यांनी घसरला आहे, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.69 टक्क्यांनी तेजीत आहे. चीनचा शांघाय कंपोझिट देखील 0.27 टक्क्यांनी वाढला आहे.
ब्रोकरेज फर्म जेफ्रीसने आदित्य बिर्ला कॅपिटलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफ्रीस म्हणाले की, आदित्य बिर्ला कॅपिटलच्या शेअरमध्ये वाढ होऊ शकते कारण कंपनीचा नफा पुढील 3 वर्षांत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.