Share Market Opening: सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण; सेन्सेक्स 250 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्सचे झाले नुकसान?

Share Market Opening: शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्री सुरू आहे.
Share Market update
Share Market updateSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 18 August 2023: शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्री सुरू आहे. कमजोर जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 64,950 च्या जवळ आला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 50 अंकांनी घसरून 19,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण

बाजाराच्या घसरणीत आयटी शेअर्सची सर्वाधिक घसरण झाली आहे. TCS, HCL टेक आणि विप्रोचे शेअर्स निफ्टीमध्ये टॉप लूसर आहेत, तर डॉ. रेड्डी यांचा शेअर 1.25 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीमधील बहुतांश शेअर्स घसरले आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्समध्ये वाढ सुरू आहे, तर 20 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 18 शेअर्स तेजीत आहेत, तर 31 शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. तसेच, 2 स्टॉक फ्लॅट आहेत.

Share Market Opening Latest Update 18 August 2023
Share Market Opening Latest Update 18 August 2023Sakal
Share Market update
Petrol Price: पेट्रोल होणार स्वस्त, निवडणुकीच्या तोंडावर महागाई रोखण्यासाठी मोदींची 1 लाख कोटी रुपयांची योजना तयार

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात, TCSचे शेअर्स आज 1.32 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे विप्रो आणि एचसीएल टेकमध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण दिसून आली.

याशिवाय टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market update
Upcoming IPO: गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! 6 महिन्यात येणार 71 कंपन्यांचे IPO, पहा कंपन्यांची यादी

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी आणि सन फार्माचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. NSE IX वर, GIFT निफ्टी 16.5 अंकांच्या किंवा 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 19,299.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र, सुरुवातीपूर्वीच्या सत्रात सेन्सेक्स 90 अंकांनी घसरला आणि निफ्टी 19,310 अंकांच्या खाली गेला.

Share Market update
Share Market Today: बाजार सुरु झाल्यानंतर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय सांगतात तज्ञ

आशियाई शेअर बाजाराची स्थिती

चीनच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित चिंता आणि अमेरिकेतील व्याजदरात वाढ होण्याची भीती असतानाही शुक्रवारी आशियाई शेअर बाजार स्वत:ला मजबूत स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र, आशियाई शेअर बाजार सलग तिसऱ्या आठवड्यात घसरणीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याचे कारण म्हणजे या आठवडाभर व्याजदराशी संबंधित निर्णयांचा शेअर बाजारावर परिणाम झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.