Share Market Opening 12 April 2023: आजच्या शेअर बाजाराची सुरुवात थोड्या वाढीने झाली आहे. फार्मा आणि बँक शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे आणि सेन्सेक्स, निफ्टी वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. आज फार्मा स्टॉक्समध्ये 4 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे आणि ICICI बँक बँकिंग स्टॉकमध्ये वर जात आहे.
बीएसईचा सेन्सेक्स 22.48 अंकांच्या किंवा 0.037 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 60,180.20 वर उघडला. NSE चा निफ्टी 37.25 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,759.55 वर ओपनिंग दाखवण्यात यशस्वी झाला आहे.
बाजार उघडण्याच्या सुरुवातीच्या मिनिटांनंतर, सेन्सेक्स 60,300 च्या पुढे व्यवहार करत आहे सेन्सेक्समध्ये आज 157 हून अधिक तेजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या शेअर्सवर नजर टाकली तर, 17 शेअर्समध्ये वाढ आणि 13 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
आज निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 31 शेअर्समध्ये वाढ दिसत आहे आणि 19 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
आज बँक निफ्टी देखील थोड्या वेगाने व्यवहार करत आहे आणि 41400 च्या पुढे गेला आहे. खाजगी बँका आणि एफएमसीजी शेअर्स हेच आज घसरणारे क्षेत्र आहेत आणि इतर सर्व निर्देशांक वाढत आहेत.
फार्मा शेअर्स सध्या 1.06 टक्के आणि आरोग्य निर्देशांक 0.92 टक्क्यांनी वाढ दर्शवत आहेत. रियल्टी निर्देशांकात मजबूती आहे आणि त्यात 0.86 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
'या' शेअर्समध्ये तेजी:
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी आणि टाटा स्टील हे आघाडीवर आहेत. एशियन पेंट्स, टायटन, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, टीसीएस, सन फार्मा आणि एम अँड एम क्षेत्र तेजीसह व्यवहार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.