Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 65,153 वर, बँक निफ्टीची काय स्थिती?

Share Market Opening: निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 3 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal
Updated on

Share Market Opening Latest Updates Today 14 August 2023:

भारतीय शेअर बाजारासाठी आजपासून नवीन व्यापारी आठवडा सुरू होत आहे. व्यवसायासाठी हा आठवडा तुलनेने लहान असणार आहे कारण उद्या मंगळवारी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशांतर्गत शेअर बाजारात सुट्टी असेल.

या अर्थाने चालू आठवड्यात फक्त चार दिवसच व्यवहार होईल. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरणीने सुरुवात होताना दिसत आहे.

आजच्या व्यवहारात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक 168.85 अंकांच्या किंवा 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह 65,153 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 44.35 अंकांच्या किंवा 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 19,383 च्या पातळीवर उघडला.

Share Market latest updates today
Tata Technologies IPO: 20 वर्षानंतर येतोय टाटांचा IPO, काय असेल प्राइस बँड?

सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची स्थिती

आज, बाजारामध्ये सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 1 शेअर वेगाने व्यवहार करत आहे. हा शेअर एनटीपीसीचा आहे. याशिवाय इतर सर्व शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

त्याच वेळी, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 3 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 46 शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे. त्याचा एका शेअर्समध्ये कोणताही बदल न होता व्यवहार करत आहे.

Share Market latest updates today
Tax on X Earnings: तुम्ही Twitter वरून पैसे कमवत आहात? तर भरावा लागेल 18% GST, काय आहे नियम?
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEX Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्सवर सर्वाधिक घसरण होणाऱ्या शेअर्सपैकी टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक घसरण 2.44 टक्क्यांनी घसरला आहे. SBI सुमारे 2 टक्क्यांनी घसरला आहे आणि JSW स्टील 1.51 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

बजाज फायनान्स 1.41 टक्के आणि टाटा स्टील 1.33 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. बजाज फिनसर्व्ह 1.07 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

याशिवाय इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, मारुती, एशियन पेंट्स, एम अँड एम, पॉवरग्रिड, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.