Share Market Opening: जागतिक संकेतांमुळे किंचित घसरणीसह बाजार उघडला, सेन्सेक्स-निफ्टीच्या शेअर्सची काय आहे स्थिती?

जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडले.
Share Market Latest Updates
Share Market Latest UpdatesSakal
Updated on

Share Market Opening 20 June 2023: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडले.

सेन्सेक्समध्ये 50.22 अंकांची किंवा 0.08 टक्क्यांची घसरण नोंदवली आणि निर्देशांक 63118.08 च्या पातळीवर उघडला. याशिवाय, निफ्टी 50 13.20 अंकांच्या म्हणजेच 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह 18742.30 च्या पातळीवर उघडला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात 1362 शेअर्समध्ये खरेदी, 666 शेअर्समध्ये विक्री आणि 120 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Share Market Opening 20 June 2023
Share Market Opening 20 June 2023Sakal

आज क्षेत्रीय निर्देशांकात, ग्राहकोपयोगी वस्तू (कंज्यूमर ड्यूरेबल्स) वगळता, इतर सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झाली आहे. ऑटो शेअर्स 0.61 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे आणि तेल आणि वायू शेअर्समध्ये 0.53 टक्क्यांची घसरण नोंदवली जात आहे. मीडिया आणि वित्तीय सेवा क्षेत्रात 0.51-0.51 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवसाय होताना दिसत आहे.

आज अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि एनडीटीव्ही तेजीसह व्यवहार करत आहेत. एसीसी, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस या शेअर्समध्ये आज घसरण झाली.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 204 अंकांनी घसरून 62963 पातळीवर आला. त्याच वेळी, निफ्टी 62 अंकांनी घसरला आणि 18692 च्या पातळीवर होता. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 11 शेअर्स तेजीसह तर 39 शेअर्स व्यवहार करत आहेत.

Share Market Latest Updates
Startup Layoffs: मोठं संकट! ही प्रसिद्ध एडटेक कंपनी करणार कर्मचारी कपात, यावेळी वरिष्ठांसह 1,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

दुसरीकडे, सेन्सेक्समधील केवळ 14 शेअर्समध्ये तेजी होती. एसबीआय लाईफ, पॉवर ग्रिड, एचडीएफसी लाईफ, टाटा कंझ्युमर आणि विप्रो हे निफ्टी टॉप गेनर्समध्ये, तर महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, यूपीएल, मारुती आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे निफ्टी टॉप लूजर्समध्ये होते.

जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमध्ये टेलिकॉम, पॉवर आणि इतर शेअर्समधील विक्रीने बाजार खाली खेचला. व्यापार्‍यांच्या मते, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यांसारख्या खाजगी क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 40 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी घसरून 18,834.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात घसरणीसह होऊ शकते, असे संकेत मिळत होते.

मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रिसर्च प्रशांत तपासे म्हणाले की, पीपल्स बँक ऑफ चायना ने अपेक्षेप्रमाणे प्रमुख व्याजदरात कपात केली असली तरी, कमकुवत जागतिक संकेतांमुळे मंगळवारी बाजारात घसरण दिसू शकते.

चीनच्या वाढीबद्दल वाढणारी चिंता, कालच्या व्यापारात FII आणि DII ची विक्री आणि मान्सूनला विलंब यामुळे गुंतवणूकदार सावध राहू शकतात.

Share Market Latest Updates
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.