Share Market Opening: शेअर बाजार घसरला, सेन्सेक्स 232 अंकांनी घसरून 65,550 वर, 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Share Market Opening: सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्समध्ये तेजी आणि 19 शेअर्समध्ये घसरण होत आहे.
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal
Updated on

Share Market Opening Latest Updates Today 3 August 2023:

काल म्हणजेच बुधवारी शेअर बाजाराची जबरदस्त घसरण झाली आणि आजही ती सुरूच आहे. आजही बँक शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बुधवारी बीएसईचा सेन्सेक्स 676 अंकांनी घसरून 65,782 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 207 अंकांनी घसरून 19,514 अंकांवर बंद झाला.

आज बाजार कसा सुरु झाला?

शेअर बाजाराची सुरुवात करताना बीएसई सेन्सेक्स 232.17 अंकांच्या किंवा 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह 65,550.61 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 63.10 अंकांच्या किंवा 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 19463.45 च्या पातळीवर उघडला.

सेन्सेक्स आणि निफ्टीची काय स्थिती?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्समध्ये तेजी आणि 19 शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. याशिवाय NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 21 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि 29 शेअर्स घसरत आहेत.

Share Market latest updates today
DLF KP Singh: 91 व्या वर्षी प्रेमात पडणारे DLFचे चेअरमन कंपनीतून पडले बाहेर, मुलींनीही विकला हिस्सा

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती

मीडिया, फार्मा, पीएसयू, हेल्थकेअर निर्देशांक क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरत आहेत. रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक 0.77 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

दुसरीकडे, धातूचे शेअर्स 0.59 टक्क्यांनी घसरत आहेत. तेल आणि वायू शेअर्समध्ये 0.36 टक्क्यांची घसरण झाली असून मो़टार शेअर्स 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Opening Latest Updates Today 3 August 2023
Share Market Opening Latest Updates Today 3 August 2023Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सन फार्मा, एनटीपीसी, रिलायन्स, एचडीएफसी, टाटा मोटर्स, एल अँड टी, आयटीसी, एसबीआय, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स तेजीत आहेत.

Share Market latest updates today
Share Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करताय; तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, मारुती, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, विप्रो, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, नेस्ले, टीसीएस, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स यांचे यांचे शेअर्स घसरले आहेत.

Share Market latest updates today
India Unemployment: सरकारला मोठा दिलासा! जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांच्या खाली, दर कमी होण्याचे कारण काय?

गौतम अदानी समूहाचे एसीसी लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेस, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीचे शेअर्स किरकोळ तेजी होती, तर अदानी पॉवर, अदानी पोर्ट, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी सोल्यूशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी विल्मारचे शेअर्स घसरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.