Share Market Closing Latest Updates Today 4 August 2023:
शेअर बाजारात आज घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 542 अंकांनी घसरला आणि 65,240 वर बंद झाला.
दिवसभरात निर्देशांक 64,963 वर घसरला. त्याचप्रमाणे निफ्टीही 135 अंकांनी घसरून 19,391 वर बंद झाला. याआधी बुधवारी (2 ऑगस्ट) भारतीय बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. BSE सेन्सेक्स 676 अंकांनी घसरून 65,782 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
बाजारातील घसरणीमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 302.39 कोटी रुपयांवर आले, जे मागील ट्रेडिंग सत्रात 303.29 लाख कोटी रुपये होते.
आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 90 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. आणि गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 4.40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाजारातील घसरणीची कारणे
यूएस मार्केटमध्ये विक्री
बँक ऑफ इंग्लंडच्या धोरणापूर्वी युरोपीय बाजार घसरला
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे
हेवीवेट स्टॉक घसरले- RIL, SBI, TCS घसरले
आजच्या व्यवहारात फार्मा, हेल्थकेअर आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बँक निफ्टी 482 अंकांनी किंवा 1.07 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, ऑइल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रातील शेअर्स घसरले. मात्र, या घसरणीच्या काळात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी फक्त 6 शेअर्स आज तेजीसह बंद झाले. यामध्येही इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 0.60% वाढ झाली. याशिवाय एनटीपीसी, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 24 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.40% घसरण झाली. यानंतर बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया आणि अल्ट्राटेक सिमेंट सर्वात जास्त घसरले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.