Share Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ, ऑटो शेअर्समध्ये...

BSE सेन्सेक्स सुमारे 350 अंकांनी वाढून 62,900 च्या अंकावर व्यवहार करत आहे.
Share Market Latest Updates
Share Market Latest UpdatesSakal
Updated on

Share Market Opening 5 June 2023: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. BSE सेन्सेक्स सुमारे 350 अंकांनी वाढून 62,900 च्या अंकावर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टी 50 अंकांनी वाढून 18500 चा टप्पा पार केला आहे. मेटल, ऑटो आणि रियल्टी शेअर्स बाजारात तेजीत आहेत.

Share Market Opening 5 June 2023
Share Market Opening 5 June 2023Sakal

आज, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्समध्ये तेजीसह व्यवहार होत आहे आणि 4 शेअर्समध्ये घसरण होत आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

\M&M 1.92 टक्‍क्‍यांनी, अ‍ॅक्सिस बँक 1.56 टक्‍क्‍यांनी, टाटा मोटर्स 1.09 टक्‍क्‍यांनी, ICICI बँक 1.07 टक्‍क्‍यांनी, पॉवरग्रिड 0.87 टक्‍क्‍यांनी आणि विप्रो 0.68 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

तसेच बजाज फायनान्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, भारती एअरटेल, एचसीएल टेक, एसबीआय, एल अँड टी, सन फार्मा, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी, टायटन, व्यवसाय. इन्फोसिस आणि नेस्लेच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

Share Market Latest Updates
OPEC: मोदींच्या खास मित्रामुळे भारताला मोठा झटका, वाढू शकतात पेट्रोल-डिझेलचे दर

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 84 अंकांच्या किंवा 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 18,713 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले.

आशियाई शेअर बाजारात तेजी:

यूएस जॉब रिपोर्टमुळे, यूएस फेड रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया थांबवू शकेल अशी आशा आहे. या अपेक्षेमुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक 6 जूनपासून सुरू होणार आहे.

या बैठकीचा निकाल 8 जून रोजी जाहीर होणार आहे. एमपीसीच्या बैठकीवर बाजाराचे बारकाईने लक्ष असणार आहे. यावेळीही आरबीआयच्या एमपीसी बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता आहे.

Share Market Latest Updates
Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.