Share Market Opening: रिझर्व्ह बँकेच्या घोषणेपूर्वी बाजारावर दबाव, सेन्सेक्स 63,200 वर, बँकिंग शेअर्समध्ये...

बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Opening 8 June 2023: बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात सपाट झाली.

BSE सेन्सेक्स 63,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 18700 च्या पातळीवर आहे. बाजारातील मंदीच्या काळातही निवडक शेअर्स तेजीत आहेत.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती:

Hero MotoCorp आणि JSW स्टीलचे शेअर्स 2-2 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. दोन्ही शेअर्सही टॉप गेनर्स आहेत. त्याच वेळी, कोटक बँक आणि बीपीसीएलच्या शेअर्समध्ये 1.25 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळत आहे.

बुधवारी सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बाजार हिरव्या चिन्हात बंद झाले. BSE सेन्सेक्स 350 अंकांनी वाढून 63,142 वर बंद झाला.

Share Market Opening 8 June 2023
Share Market Opening 8 June 2023Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बीएसई सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात पॉवरग्रिडचा शेअर सर्वाधिक 0.86 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनटीपीसी, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि आयटीसी हे शेअर्स तेजीने व्यवहार होत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि टेक महिंद्रा हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Share Market
Startup Success Story: शिक्षण सोडले, 19व्या वर्षी 'किराणा स्टोअर' उघडून उभारली 7,300 कोटींची कंपनी

RBI बैठकीच्या निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध:

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आज RBI MPC बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देतील. देशाला विकासाच्या मार्गावर ठेवण्यासाठी आरबीआय धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल करणार नाही, अशी दलाल स्ट्रीटची अपेक्षा आहे.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 9 अंकांच्या किंवा 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 18,821 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सपाट होऊ शकते असे संकेत मिळाले. सेन्सेक्स 15 अंकांनी घसरला आणि निफ्टी 18,710 अंकांच्या खाली घसरला तेव्हा प्री-ओपनिंग सत्रातही हे दिसून आले.

Share Market
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.