Share Market Opening Latest Updates Today 9 August 2023:
बुधवारी शेअर बाजार सपाट उघडला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 65,700 आणि निफ्टी 19,500 च्या पातळीवर आला आहे.
RIL आणि TCS सारखे हेवीवेट शेअर बाजारावर दबाव आणण्याचे काम करत आहेत. तर, जोरदार निकालांमुळे कोल इंडियाचा शेअर सुमारे दीड टक्क्यांनी वाढला आहे. पॉवर शेअर्समध्येही जोरदार खरेदी होत आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स तेजीत आहेत आणि 19 शेअर्स घसरत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 21 शेअर्समध्ये तेजी दिसत असून 28 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण
ICICI बँक, मारुती, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, ITC, TCS, HDFC बँक, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक आणि बजाज फायनान्सचे शेअर्स आज बीएसई सेन्सेक्सवर सुरुवातीच्या व्यापारात घसरणीसह व्यवहार करत होते.
सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी
एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रिड, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, सन फार्मा, नेस्ले इंडिया आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सेन्सेक्सवर वाढीसह व्यवहार करत होते.
NSE IX वर, GIFT निफ्टी 45 अंकांच्या म्हणजेच 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 19,605.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले. पण प्री-ओपनिंग सत्रापासूनच बाजारात घसरणीचा कल दिसून आला.
'या' कंपन्या आज आर्थिक निकाल जाहीर करतील
टाटा पॉवर, बर्जर पेंट्स, आयआरसीटीसी, झी आणि मॅक्स फायनान्शियलसह इतर कंपन्या त्यांचे जून तिमाहीचे आर्थिक निकाल आज जाहीर करतील. यामुळे हे शेअर्स आज चर्चेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.