Intraday Trading: गेल्या काही वर्षांत भारतीयांमध्ये शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा कल वाढला आहे. इतर गुंतवणुकीच्या पर्यायांच्या तुलनेत चांगला परतावा मिळाल्याने लोक शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. परंतु, प्रत्येक व्यक्ती येथून पैसे कमवत आहे असे नाही.
अनेक लोक आपल्या कष्टाने कमावलेले पैसे येथे गुंतवत आहेत. मात्र, बाजारातील आकडेवारी गुंतवणूकदारांना घाबरवणारी आहे. डेरिव्हेटिव्ह विभागाऐवजी कॅश सेगमेंटमध्ये पैसे गुंतवले तरी बहुतांश गुंतवणूकदारांना, विशेषत: लहान गुंतवणूकदारांना शेअर बाजारात तोटा सहन करावा लागतो.
बाजार नियामक SEBI च्या अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की मार्च 2023 ला संपलेल्या 2022-23 आर्थिक वर्षात कॅश सेगमेंटमध्ये इंट्राडे ट्रेड करणाऱ्या प्रत्येक 10 पैकी 7 गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला.
याचा अर्थ असा की कॅश सेगमेंटमध्ये इंट्राडे ट्रेड करणाऱ्या 70 टक्के गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. यावरुन असे दिसून येते की बहुतेक गुंतवणूकदार बाजारात पैसे गमावतात.
सेबीच्या अहवालात असे दिसून आले आहे की बाजारात गुंतवणूकदारांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसे इंट्राडेमध्ये व्यापार करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्याही वाढत आहे.
अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2018-19 ते 2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश सेगमेंटमध्ये इंट्राडे ट्रेड करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संख्येत 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कॅश सेगमेंटमध्ये प्रत्येक तीन गुंतवणूकदारांपैकी एकाने इंट्राडे ट्रेडमध्ये भाग घेतला.
ताज्या अहवालात, F&O प्रमाणे, बहुतेक तरुण गुंतवणूकदार इंट्राडेमध्ये देखील सहभागी होत आहेत. अहवालानुसार, इंट्राडे सेगमेंटमध्ये नुकसान झालेल्या 76 टक्के गुंतवणूकदारांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे.
2018-19 ते 2022-23 या आर्थिक वर्षात शेअर बाजारात इंट्राडे ट्रेड करणाऱ्या तरुण गुंतवणूकदारांची (30 वर्षांपेक्षा कमी वयाची) संख्या 18 टक्क्यांवरून 48 टक्क्यांवर पोहोचली आहे.
याआधी, सेबीने काही काळापूर्वी फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये व्यापार करणाऱ्यांबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात, सेबीने म्हटले होते की बाजारातील डेरिव्हेटिव्ह विभागातील 90 टक्क्यांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांना म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये तोटा सहन करावा लागतो. सेबी गुंतवणूकदारांना फ्युचर्स आणि ऑप्शन्सपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.