मुंबई : शेअर बाजारात आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकानं अर्थात एनएसईनं नवं रेकॉर्ड प्रस्थापित केलं आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात सातत्यानं तेजीत सुरु असलेल्या या निर्देशांकानं सोमवारी २०,००० अंशांचा टप्पा पार केला. निफ्टीची विशेष बाब म्हणजे या निर्देशांकानं आपल्या २७ वर्षांच्या कारकीर्दीत गुंतवणुकदारांना २० टक्के परतावा दिला आहे. (Record Breaking Nifty Benchmark Index Soars to 20000)
एनएसईत आत्तापर्यंत RIL, HDFC Bank, L&T आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या गुंतवणुकदारांवर चांगलाच धनवर्षाव केला. जाणून घ्या गेल्या वीस वर्षात जागतीक या निर्देशंकाचा प्रवास कसा राहिला? गेल्या २० वर्षात निफ्टीनं गुंतवणूकदारांना १४ टक्के परतावा दिला आहे.
दरम्यान, डाओ जोंस निर्देशांक १९९६ (५,५६५) तर आजचा स्तर ३४,५७७ इतका आहे. या काळात गुंतवणूकदारांना ६.२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला. त्यानंतर हैंगसेंगनं १९९६ (१०,९०९) तर २०२३ (१८,०६०) गुंतवणूकदारांना १.७ टक्के परतावा. तर निफ्टी १९९६ (१०००) २०२३ (२०,०००) यातील लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल २० टक्के परतावा मिळाला आहे.
RIL - 20 वर्षात ४५ पटींनी वाढ
HDFC Bank - 20 वर्षात ६१ पटींनी वाढ
ICICI Bank - 20 वर्षात ३४ पटींनी वाढ
HUL - 20 वर्षात १२ पटींनी वाढ
ITC - 20 वर्षात २९ पटींनी वाढ
SBI - 20 वर्षात १५ पटींनी वाढ
टाटा मोटर्स - 20 वर्षात ३१ पटींनी वाढ
टाटा स्टील - 20 वर्षात ११ पटींनी वाढ
L&T - 20 वर्षात ५८ पटींनी वाढ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.