Share Market: भाजपच्या दणदणीत विजयानंतर कोणत्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत? ब्रोकरेज फर्मने जाहीर केली यादी

Share Market: विधानसभा निवडणुकीच्या निकालाने बाजारात तेजी
Share Market SBI to Titan Motilal Oswal highlights 14 stock picks post BJP's triumph in three Indian states
Share Market SBI to Titan Motilal Oswal highlights 14 stock picks post BJP's triumph in three Indian states Sakal
Updated on

Share Market: भारतीय जनता पक्षाच्या 3 राज्यांमधील बहुमताचा परिणाम शेअर बाजारातील वाढीच्या रूपातही दिसून येत आहे. आज सोमवारी बाजाराची सुरुवात मोठ्या तेजीसह झाली.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा विश्वास आहे की 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल राजकीय स्थिरता आणतील आणि याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल. पुढे जाऊन मार्केटही मजबूत होईल.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या या विजयानंतर मोतीलाल ओसवाल म्हणतात की BFSI, इंडस्ट्रियल, रिअल इस्टेट, ऑटो आणि कन्झ्युमर डिस्क्रीशनरी सेक्टर्स हे सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र आहेत.

मोतीलाल ओसवाल यांनी कोणते शेअर्स सुचवले?

ब्रोकरेज फर्मच्या सर्वाधिक पसंतीच्या शेअर्सच्या यादीत SBI, Axis Bank, Mahindra & Mahindra, Hero MotoCorp, L&T, UltraTech Cement, Titan आणि Indian Hotels सारख्या शेअर्सचा समावेश आहे. मिडकॅप स्पेसमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज, इंडिया हॉटेल्स, लेमन ट्री, सनटेक रियल्टी, पीएनबी हाउसिंग, एंजेल वन आणि ग्लोबल हेल्थ हे सर्वात चांगले शेअर्स आहेत.

Share Market SBI to Titan Motilal Oswal highlights 14 stock picks post BJP's triumph in three Indian states
Air India: रतन टाटांच्या एअर इंडिया एक्सप्रेसला कामगार मंत्रालयाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने बाजारात तेजी

ब्रोकरेज फर्मने सांगितले की, "राज्यांच्या निकालांबाबत इक्विटी मार्केटमध्ये अस्वस्थता होती, जी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचे संकेत म्हणून पाहिले जात होते. आता निकाल भाजपच्या बाजूने आला आहे, त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतही अशीच स्थिती राहिल्यास बाजाराला चालना मिळेल." याशिवाय अर्थव्यवस्थेमध्ये भारताची वाढ दिसत आहे. जीडीपी आणि कॉर्पोरेट कमाईच्या बाबतीत परिस्थिती चांगली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बाजारात तेजीचे संकेत?

आता राजस्थान आणि छत्तीसगडही भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या टीममध्ये सामील झाले आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये भाजपचे आधीच दुहेरी इंजिनचे सरकार आहे.

Share Market SBI to Titan Motilal Oswal highlights 14 stock picks post BJP's triumph in three Indian states
Zerodha Down: शेअर बाजार तेजीत असताना गुंतवणूकदार अडचणीत, झिरोधा अ‍ॅपवर ट्रेडिंग करताना...

ब्रोकरेज फर्मने असेही म्हटले आहे की सार्वत्रिक निवडणुकीच्या 6 महिन्यांपूर्वी, गेल्या 5 वेळा, निफ्टीने 9%-36% परतावा दिला आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.