Share Market Opening Latest Update 18 May 2024: डिझास्टर रिकव्हरी साइटच्या चाचणीसाठी शेअर बाजार आज शनिवारी सुरु आहे. बाजार सपाट उघडला, पण सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने 74,000 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टी देखील 40 अंकांच्या वाढीसह 22,500 च्या वर व्यवहार करत आहे. फार्मा, मीडिया, ऑटो, रियल्टी निर्देशांकात चांगली वाढ दिसून येत आहे. ONGC, PowerGrid, Asian Paints सारखे शेअर्स निफ्टी वर टॉप गेनर्स आहेत. त्याच वेळी, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स सर्वाधिक घसरला आहे.
आज शनिवारी देखील डिझास्टर रिकव्हरी साइटच्या चाचणीसाठी बाजार खुला आहे. NSE आणि BSE द्वारे डिझास्टर रिकव्हरी साइटची चाचणी केली जाईल ज्यामुळे बाजार 2 सत्रांमध्ये उघडेल. पहिले सत्र प्राइमरी साइटवर सकाळी 9.15 ते 10 या वेळेत होईल ज्यामध्ये तुम्ही थेट ट्रेडिंग करू शकाल.
दुसरे सत्र डिझास्टर रिकव्हरी साइटवर स्विच ओव्हर केले जाईल ज्याची वेळ सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 दरम्यान असेल. रोख आणि F&O विभागांमध्ये व्यवहार होईल. याशिवाय, सर्व शेअर्समध्ये 5% सर्किट मर्यादा असेल.
शुक्रवारी निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह 22466 अंकांवर बंद झाला. सलग 11 ट्रेडिंग सत्रांच्या घसरणीनंतर, एफआयआयने शुक्रवारी रोख बाजारात 1616 कोटी रुपयांची खरेदी केली. सोमवारी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार आहेत.
जागतिक बाजारांची स्थिती पाहिली तर हा आठवडा चांगला राहिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ट्रेडिंगमध्ये डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज प्रथमच 40 हजार पार करण्यात यशस्वी झाला. हा निर्देशांक 0.34 टक्क्यांनी वर राहिला. S&P 500 0.12 टक्क्यांनी किरकोळ वाढला, तर Nasdaq Composite Index ला 0.07 टक्क्यांनी किरकोळ नुकसान झाले. संपूर्ण आठवड्यात डाऊ जोन्स 1.24 टक्के, S&P 500 1.54 टक्के आणि Nasdaq 2.11 टक्क्यांनी वधारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.