Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

वाढती महागाई आणि व्याजदर या सगळ्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Tips : मंगळवारी बऱ्याच चढ-उतारानंतर सेन्सेक्स-निफ्टी काहीशा घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 18.82 अंकांच्या म्हणजेच 0.03 टक्क्यांच्या घसरणीसह 60672.72 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 17.90 अंकांच्या म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह 17826.70 वर बंद झाला. निफ्टी बँक 28 अंकांनी घसरून 40674 वर बंद झाला. तर मिडकॅप 110 अंकांनी घसरून 30557 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

वाढती महागाई आणि व्याजदर या सगळ्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने डेली चार्टवर बियरीश कँडल तयार केली आहे जी बाजारासाठी चांगला संकेत नाही.

जोपर्यंत निफ्टी 17900 च्या खाली राहील, तोपर्यंत नेगिटीव्ह ट्रेंड कायम असेल. ज्यामुळे निफ्टी 17750-17700 पर्यंत खाली जाताना दिसू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टीने 17900 ची पातळी ओलांडली तर ही तेजी पुलबॅक रॅलीमध्ये बदलू शकते आणि निफ्टी 17950-18000 च्या दिशेने जाताना दिसू शकतो.

सध्या जे तांत्रिक सिग्नल मिळत आहेत, त्यानुसार निफ्टीमध्ये 18150 - 17650 च्या रेंजमध्ये कंसोलिडेशन होईल असे दिसत असल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीला वरच्या बाजूने 17920 - 17950 आणि डाउनसाइडवर 17650 - 17600 वर सपोर्ट दिसत आहे.

Share Market
Stock Split : 'या' शेअरकडून स्टॉक स्प्लिटची घोषणा, अधिक जाणून घेऊयात...

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

Share Market
..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()