Share Market Opening: RBIच्या धोरणाआधीच शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 74,000 जवळ, कोणत्या शेअर्सवर दबाव?

Sensex-Nifty Today: शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. आरबीआयच्या धोरणाआधी बाजार दबावाखाली आहे. ऑटो आणि आयटी क्षेत्रात विक्री होत आहे.
Share Market Opening Latest Update
Share Market Opening Latest UpdateSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 5 April 2024 (Marathi News): शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. आरबीआयच्या धोरणाआधी बाजार दबावाखाली आहे. ऑटो आणि आयटी क्षेत्रात विक्री होत आहे. तर एचडीएफसी बँकेत खरेदी होत आहे.

सेन्सेक्स 74,100 आणि निफ्टी 22500 च्या जवळ व्यवहार करत आहे. SBI लाइफला सर्वाधिक फायदा झाला आणि BPCL निफ्टीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले.

Share Market Opening
Share Market OpeningSakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ दिसून येत होती तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आज गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या चलनविषयक धोरणावर लक्ष ठेवणार आहेत.

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ज्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली त्या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ, डॉक्टर लेडीज, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांचे शेअर्स होते.

Share Market Opening
Share Market OpeningSakal

तर ज्या शेअर्समध्ये घसरण झाली त्यात BPCL JSW, स्टील, हिंदाल्को, ॲक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स होते.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण होती, तर निफ्टी फॉर्म आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किरकोळ वाढत होते.

Share Market Opening Latest Update
Renuka Jagtiani: कोण आहेत रेणुका जगतियानी? सर्वात श्रीमंतांच्या यादीत एन्ट्री; पती लंडनमध्ये चालवायचे कॅब
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरणाच्या घोषणेमुळे शेअर बाजाराच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. आज बँकिंग शेअर्सवर लक्ष असणार आहे. आरबीआयच्या एमपीसीमध्ये व्याजदरात कोणताही बदल अपेक्षित नाही, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, परंतु रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या टिप्पणीवर शेअर बाजारातील गुंतवणूकदार लक्ष ठेवणार आहेत.

Share Market Opening Latest Update
Insurance Ombudsman : ‘विमा लोकपाल’तर्फे ३६ हजार तक्रारी निकाली

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत?

बजाज फायनान्स: चौथ्या तिमाहीत कंपनीचा AUM 3.3 लाख कोटी रुपये होता. जो वार्षिक आधारावर 34% अधिक आहे. तर ठेवी 35% ने वाढून 60,100 कोटी रुपये झाल्या आहेत.

नेस्ले इंडिया: कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने 2015मध्ये मॅगी नूडल्सबाबत ग्राहक व्यवहार विभागाने दाखल केलेली तक्रार फेटाळली आहे.

प्रेस्टीज इस्टेट्स: कंपनीने व्हाईटफिल्ड, बेंगळुरू येथे 21 एकर जमीन निवासी विकासासाठी अधिग्रहित केली आहे, ज्यामध्ये अंदाजे 1,800 अपार्टमेंट्ससह अंदाजे 40 लाख चौरस फूट क्षेत्रफळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.