Share Market Closing Latest Update 10 April 2024: ईदपूर्वी शेअर बाजारात जबरदस्त खरेदी झाली. बुधवारी बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 354 अंकांनी वाढून 75,038 वर बंद झाला. निफ्टीनेही 111 अंकांची वाढ केली आणि 22,753 वर पोहोचला. बँक निफ्टी आणि मिडकॅप निर्देशांकानेही व्यवहाराच्या सत्रात सर्वकालीन उच्चांक गाठला. बाजारात आज (10 एप्रिल) सर्वाधिक खरेदी मेटल क्षेत्रात झाली.
शेअर बाजारात निफ्टीच्या मिड कॅप 100 निर्देशांकात एक टक्क्याची वाढ झाली. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो इंडेक्सने शेअर बाजार खाली खेचण्याचा प्रयत्न केला परंतु निफ्टी बँक, निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकाने बाजारातील तेजी टिकवून ठेवण्यास मदत केली. बुधवारी मेटल शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, भारती एअरटेल आणि बँक शेअर्सच्या वाढीमुळे शेअर बाजार तेजीसह बंद झाला.
आजच्या व्यवहारात आयटीसी 2.49 टक्के, कोटक महिंद्रा 2.40 टक्के, भारती एअरटेल 2.11 टक्के, एसबीआय 1.94 टक्के, एशियन पेंट्स 1.36 टक्के, टेक महिंद्रा 1.35 टक्के आणि रिलायन्स 1.08 टक्के वाढीसह बंद झाले. मारुती सुझुकी 1.60 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 0.83 टक्क्यांनी, लार्सन 0.73 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले आहे. बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप 402.16 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 399.92 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 2.24 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.
बीएसईच्या आकडेवारीनुसार, 3933 शेअर्सचे व्यवहार झाले ज्यामध्ये 1960 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 1867 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 107 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.