Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; बँकिंग क्षेत्रात विक्रीचा दबाव, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: गुरुवारी शेअर बाजारातील व्यवहार घसरणीसह सुरू झाले. बँकिंग क्षेत्राकडून दबाव आहे, तर आयटी, वाहन आणि मेटल क्षेत्रातून खरेदी होत आहे. सेन्सेक्स 72600 आणि निफ्टी 22000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market Opening Latest Update 22 February 2024: गुरुवारी शेअर बाजारातील व्यवहार घसरणीसह सुरू झाले. बँकिंग क्षेत्राकडून दबाव आहे, तर आयटी, वाहन आणि मेटल क्षेत्रातून खरेदी होत आहे. सेन्सेक्स 72600 आणि निफ्टी 22000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

निफ्टीच्या शेअर्सची स्थिती

एनएसई निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 25 शेअर्स वधारत आहेत आणि 25 शेअर्स घसरत आहेत, म्हणजेच परिस्थिती अगदी समान आहे. निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये आयशर मोटर्स 2.28 टक्के आणि ॲक्सिस बँक 2.15 टक्क्यांनी वधारले. टेक महिंद्रा 1.56 टक्क्यांनी आणि एचसीएल टेक 1.50 टक्क्यांनी वर आहे.

share Market
share MarketSakal

बँक निफ्टी 47 हजारांच्या खाली घसरला

बँक निफ्टी 47 हजारांच्या खाली घसरला असून तो 70 अंकांनी घसरून 46,949 च्या पातळीवर आला आहे. बँक निफ्टीच्या 12 शेअर्सपैकी फक्त 4 शेअर्स वधारत आहेत आणि 8 शेअर्स घसरत आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो यांसारख्या निर्देशांकात तेजी होती तर निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस घसरणीसह व्यवहार करत होते. आज अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी चार कंपन्यांचे शेअर्स घसरले होते तर अदानी पॉवरचा शेअर किंचित वाढीसह व्यवहार करत होता.

Share Market
PM Kisan Yojana: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' तारखेला खात्यात येणार दोन हजार रुपये
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEX Sakal

पेटीएम आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ब्लॉक डीलद्वारे 36.9 लाख शेअर्सच्या विक्रीमुळे पेटीएमच्या शेअर्सवर दबाव आहे. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी आणि फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या वृत्तामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार सावध आहेत.

गुरुवारी तेलाच्या किंमतीत वाढ झाली, त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. गुरुवारी गिफ्ट निफ्टी 89 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. यावरून असे सूचित होते की भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करू शकेल परंतु तसे झाले नाही.

Share Market
Loan App News : कर्ज ‘ॲप’वर कठोर निर्बंध आवश्‍यक ; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नियामकांना सूचना

साखर शेअर्सवर दबाव

साखरेच्या शेअर्सवर दबाव आहे. बजाज हिंदमध्ये सर्वाधिक 3.12 % घसरण झाली आहे. यासोबतच बलरामपूर साखर कारखानाही 1.34 टक्क्यांनी घसरत आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2024-25 हंगामासाठी उसाची एफआरपी 25 रुपयांनी वाढवून 340 रुपये प्रति क्विंटल करण्याची घोषणा केली. ऊस उत्पादकांना कारखान्यांनी द्यावी लागणारी किमान किंमत म्हणजे एफआरपी. त्यामुळे साखरेच्या शेअर्सवर दबाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.