Share Market Closing Latest Update 19 July 2024: देशांतर्गत शेअर बाजारात आज (शुक्रवार, 19 जुलै) मोठी घसरण झाली. अर्थसंकल्पापूर्वी बाजारात जोरदार प्रॉफिट बुकींग झाले आणि ट्रेडिंग सत्रांमध्ये सेन्सेक्स-निफ्टी नीचांकी पातळीवर आले. निफ्टीने 24,500 चा स्तर गाठला तर सेन्सेक्सने 80,600 चा स्तर गाठला. आज विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकींग झाली.
याआधी निफ्टीने 24,854 चा नवा उच्चांक गाठला होता आणि सेन्सेक्सनेही 81,587 ची नवीन विक्रमी पातळी गाठली होती. निफ्टी 269 अंकांनी घसरून 24,530 वर बंद झाला. सेन्सेक्स 738 अंकांनी घसरून 81,604 वर बंद झाला, तर निफ्टी बँक 355 अंकांनी घसरून 52,265 वर बंद झाला. सर्वात मोठी घसरण मेटल शेअर्समध्ये झाली.
आजच्या व्यवहारात इन्फोसिस, ITC, LTIMindtree, Asian Paints, SBI हे शेअर्स निफ्टी वर सर्वाधिक वाढले. तर, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, बीपीसीएल, टेक महिंद्रा यांचा टॉप लूजर्सच्या यादीत होते. सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते.
शुक्रवारी मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या क्रॅशमुळे कामकाजात कोणताही व्यत्यय आला नसल्याचे देशांतर्गत शेअर बाजारांनी सांगितले. स्टॉक ब्रोकर्स आणि एअरलाइन्सवर मोठा परिणाम झाला आहे.
एनएसईच्या प्रवक्त्याने सांगितले की एक्सचेंज आणि एनएसई क्लियरिंग लिमिटेड नेहमी प्रमाणे काम करत आहे. त्याचप्रमाणे, बीएसईच्या प्रवक्त्याने सांगितले की मायक्रोसॉफ्ट क्रॅशमुळे कोणतीही समस्या आली नाही.
भारतीय शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर सर्व शेअर्सचे बाजार भांडवल 446.25 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 454.32 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 8.07 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज BSE सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त 4 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.92 टक्के वाढ झाली. यानंतर, ITC, Asian Paints आणि HCL Tech चे शेअर्स सर्वाधिक वाढले.
सेन्सेक्समधील उर्वरित 26 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही टाटा स्टीलचे शेअर्स 5.17 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.