Share Market Closing Latest Update 30 April 2024: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. दिवसभरात निफ्टीमध्ये उच्चांक होता, परंतु बाजार बंद होईपर्यंत प्रॉफिट बुकिंग झाली. बाजार बंद होण्यापूर्वी शेवटच्या अर्ध्या तासात बाजारात मोठी घसरण झाली.
निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून 215 अंकांनी घसरला आणि दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 765 अंकांनी घसरला. बाजार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स 188 अंकांनी घसरून 74,482 अंकांवर तर एनएसईचा निफ्टी 38 अंकांच्या घसरणीसह 22,604 अंकांवर बंद झाला.
महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प या शेअर्सचा समावेश शेअर बाजारातील टॉप गेनर्समध्ये होता. तर टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली आहे.
मंगळवारी निफ्टी सेक्टरल इंडेक्स निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण झाली. तर निफ्टी ऑटो सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक वाढीसह बंद झाला.
मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारा दरम्यान शेअर बाजारात चांगली वाढ झाली होती, मात्र प्रॉफिट बुकींगमुळे बाजार लाल चिन्हावर पोहोचला. मंगळवारपासून शेअर बाजाराच्या व्यवहाराला जोरदार सुरुवात झाली.
दरम्यान, निफ्टीने 22,800 अंकांचा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मंगळवारी शेअर बाजाराचा व्यवहार निफ्टीमध्ये 22,680 च्या पातळीवर सुरू झाला होता, तर त्याने 22,800 ची उच्च पातळी आणि 22,662 ची नीचांकी पातळी पाहिली.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये बीएसई लिमिटेड, एशियन पेंट्स आणि ओएनजीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे, तर विप्रो, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लार्सन अँड टुब्रो आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 30 एप्रिल रोजी वाढून 406.58 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवारी 29 एप्रिल रोजी 406.52 लाख कोटी रुपये होते.
अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज केवळ 6,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.