Share Market Closing Latest Update 9 July 2024: मंगळवारी (9 जुलै) देशांतर्गत शेअर बाजारांनी पुन्हा विक्रमी उच्चांक केला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही नवीन उंची गाठली. निफ्टीने 24,443 चा नवीन उच्चांक गाठला आणि सेन्सेक्सने 80,397 चा नवीन उच्चांक गाठला. निफ्टी 112 अंकांनी वाढून 24,433 वर बंद झाला.
सेन्सेक्स 391 अंकांनी वाढून 80,351 वर बंद झाला. निफ्टी बँक 143 अंकांनी वधारून 52,568 वर बंद झाला. मारुती सुझुकीने सर्वाधिक वाढ नोंदवली. त्याचबरोबर फार्मा शेअर्सही तेजीत होते.
आजच्या बाजारात ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी सेक्टरमध्ये चांगली खरेदी दिसून आली. PSU बँकांचे शेअर्सही वधारले आणि खाजगी बँकांचे शेअर्स स्थिर राहिले. आयटी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव होता.
आजच्या बाजारात निफ्टी 50 च्या टॉप गेनर्सच्या यादीत मारुती सुझुकीचा शेअर अव्वल आहे. एकेकाळी मारुतीचे शेअर्स 7 टक्क्यांनी वाढले होते. दिवसअखेर ते 6 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्रा, डिव्हिस लॅब, आयटीसी 2 टक्क्यांहून अधिक वाढले. सन फार्मा आणि टायटन कंपनीचे शेअर्स 1.70 टक्क्यांनी वाढले.
भारतीय बाजारातील प्रचंड वाढीमुळे मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 451.26 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 449.71 लाख कोटी रुपये होते. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.55 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. मारुती, एम अँड एम, आयटीसी, टायटन आणि सन फार्मा हे शेअर्स वाढले. याशिवाय नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, टीसीएस, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक आणि एचयूएल यांचे शेअर्स वधारले.
दुसरीकडे, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स लाल रंगात बंद झाले. रिलायन्स, कोटक बँक, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि इन्फोसिस हे शेअर्स घसरले. याशिवाय टाटा स्टील, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एनटीपीसी, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.