Share Market Closing: शेअर बाजारात घसरण कायम; सेन्सेक्स 177 अंकानी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing Today: आज मंगळवारी (6 ऑगस्ट) जोरदार सुरुवात झाल्यानंतर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. विशेषत: मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. बँक निफ्टी 300 हून अधिक अंकांनी घसरला.
Share Market Closing
Share Market Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 6 August 2024: आज मंगळवारी (6 ऑगस्ट) जोरदार सुरुवात झाल्यानंतर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. विशेषत: मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. बँक निफ्टी 300 हून अधिक अंकांनी घसरला. तेजीच्या सुरुवातीनंतर बाजारात नफा बुकिंग दिसून आला, त्यानंतर निफ्टी सुमारे 375 अंकांनी घसरला आणि 24,000 च्या जवळ बंद झाला.

सेन्सेक्स वरपासून सुमारे 177 अंकांनी घसरला, 78,593च्या जवळ बंद झाला. निफ्टी बँक देखील वरपासून सुमारे 950 अंकांनी घसरला आणि 49800 च्या जवळ बंद झाला. मिड-स्मॉलकॅप इंडेक्सही घसरले, सर्वात मोठी घसरण सरकारी बँकिंग स्टॉक्स आणि एनबीएफसीमध्ये झाली, ज्याचा परिणाम बँक निफ्टीवर झाला.

Share Market Today
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारातील वाढत्या शेअर्समध्ये गोदरेज प्रॉपर्टीज 3.49 टक्क्यांच्या वाढीसह, ब्रिटानिया 2.81 टक्क्यांच्या वाढीसह, इप्का लॅब 2.69 टक्क्यांच्या वाढीसह, IGL 1.40 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Share Market Closing
Bangladesh Crisis: बांगलादेशच्या राजकीय संकटाची झळ भारतालाही; गुंतवणूकदार विकत आहेत 'या' कंपनीचे शेअर्स

याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील 2.41 टक्के, टेक महिंद्रा 2.07 टक्के, एल अँड टी 1.62 टक्के, एचयूएल 1.55 टक्के, टाटा स्टील 0.97 टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये मॅरिको 6.49 टक्के, एलआयसी हाऊसिंग फायनान्स 5 टक्के, पॉवर फायनान्स 4.82 टक्के, एचडीएफसी लाईफ 4.40 टक्के, बाटा इंडिया 2.70 टक्क्यांनी घसरले.

Share Market Today
BSE SENSEXSakal
Share Market Closing
Sun Group: '7 कोटी रुपये, 18 खटले, 62 जण...', पद्मश्री उद्योजक सुंदर मेनन यांना अटक; मोठे कारण आले समोर

गुंतवणूकदारांचे 1.57 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 6 ऑगस्ट रोजी 440.27 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवारी 5 ऑगस्ट रोजी 441.84 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

Share Market Closing
IRDAI Consumer Support:‘आयआरडीए’चे ग्राहकाभिमुख पाऊल

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज एकूण 4,028 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,344 शेअर्स वाढीसह बंद झाले. 92 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 111 शेअर्स कोणतेही चढ-उतार न होता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 188 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 41 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.