Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: सध्याच्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदानामुळे शेअर बाजार अडचणीत आला असून चढ-उतारांचा सामना करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार परत आले नाही, तर नव्या सरकारला सध्याची धोरणे सुरू ठेवण्यात अडचण येण्याची भीती शेअर बाजाराला आहे.
Share Market Today
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Closing Latest Update 17 May 2024: चालू आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदानामुळे शेअर बाजार अडचणीत आला असून चढ-उतारांचा सामना करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार परत आले नाही, तर नव्या सरकारला सध्याची धोरणे सुरू ठेवण्यात अडचण येण्याची भीती शेअर बाजाराला आहे.

Share Market Closing
Share Market TodaySakal

त्यामुळे बाजाराला चढ-उतारांचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 253 अंकांच्या वाढीसह 73917 अंकांच्या पातळीवर बंद झाला, त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 61 अंकांच्या वाढीसह 22465 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये वाढ झाली. M&M, अल्ट्राटेक सिमेंट, JSW स्टील आणि BPCL हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. सीआयपीएलए, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एसबीआय लाईफ, एचसीएल आणि ब्रिटानिया हे शेअर्स निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे ठरले आहेत.

Share Market Closing
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात तेल आणि गॅस, ऊर्जा, मेटल, वाहन, बँकिंग शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक जोरदार वाढीसह बंद झाले. बीएसईच्या 3,939 शेअर्सपैकी 2,408 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 1,407 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 124 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Share Market Closing
S&P BSE SENSEXSakal
Share Market Today
Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

मार्केट कॅप विक्रमी पातळीवर

बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजार भांडवल ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, प्रथमच लिस्टेड स्टॉक्सचे मार्केट कॅप 410 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे आणि 410.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 407.35 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 2.89 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

शुक्रवारी शेअर बाजारातील वाढीमुळे महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल, कोटक बँक आणि श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले. शेअर बाजारात तेजी असताना टीसीएस, सिप्ला, एसबीआय लाइफ, एचसीएल टेक, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि नेस्ले इंडिया या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

Share Market Today
Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. निफ्टी निर्देशांकाबद्दल बोलायचे तर निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण झाली तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.