Share Market Closing: चार दिवसांच्या घसरणीला लागला ब्रेक; निफ्टीने घेतली 154 अंकांची उसळी, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Today: चार दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे आणि आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 22150 वर आणि सेन्सेक्स 73088 वर बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाली.
Share market today Sensex, Nifty 50 end in green led by bank, metal stocks
Share Market TodaySakal
Updated on

Share Market Closing Latest Update 19 April 2024: चार दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे आणि आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 22,150 वर आणि सेन्सेक्स 73,088 वर बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाली. आयटी, रियल्टी निर्देशांकात घसरण झाली. इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची बातमी आली. त्यानंतर निफ्टी 21,777 अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर इराणने हल्ल्याचे वृत्त फेटाळून लावले.

Share Market Closing
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

भारतीय बाजारपेठेत तेजी बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे आली आहे. निफ्टी बँकेत 500 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्राशी संबंधित शेअर्स तेजीसह बंद झाले.

हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट मीडिया, एनर्जी फार्मा आणि आयजी शेअर्स घसरणीसह बंद झाले. बाजाराने पुन्हा वेग पकडला पण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share market today Sensex, Nifty 50 end in green led by bank, metal stocks
Nestle India: गुंतवणूकदार चिंतेत! सरकारच्या कारवाईचा नेस्ले कंपनीला फटका; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
Share Market Closing
Share Market TodaySakal

बँक निफ्टीमध्ये चांगली वाढ

निफ्टी बँक निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स घसरले तर एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, विप्रो आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स तेजीत होते.

Share Market Closing
S&P BSE SENSEXSakal

मार्केट कॅपमध्ये 58,000 कोटी रुपयांची वाढ

भारतीय शेअर बाजारात परतलेल्या या तेजीमुळे मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 393.47 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे तर शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 392.89 लाख कोटी रुपये होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅपमध्ये 58,000 कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळाली.

Share market today Sensex, Nifty 50 end in green led by bank, metal stocks
Air India Express: टाटा एअरलाइन्सची खास ऑफर; मतदान करणाऱ्यांना करता येणार स्वस्तात प्रवास

कोणते शेअर्स वाढले?

आजच्या व्यवहारात बजाज फायनान्स 3,16 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.72 टक्के, एचडीएफसी बँक 2.46 टक्के, मारुती सुझुकी 2.20 टक्के, विप्रो 1.92 टक्के वाढीसह बंद झाले. एचसीएल टेक 1.20 टक्के, नेस्ले 1.04 टक्के, टीसीएस 0.93 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.