Share Market Closing: शेअर बाजार घसरणीतून सावरला; सेन्सेक्स 74,000च्या वर बंद, निफ्टीची काय आहे स्थिती?

Share Market Closing: आज दिवसभर तीव्र चढ-उतार झाल्यानंतर शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 73,000च्या वर बंद झाला, परंतु निफ्टी 22,600 च्या खाली राहिला. बाजारात सलग 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला आहे.
Share Market Today
Share MarketSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 31 May 2024: आज दिवसभर तीव्र चढ-उतार झाल्यानंतर शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 73,000च्या वर बंद झाला, परंतु निफ्टी 22,600 च्या खाली राहिला. बाजारात सलग 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला आहे. निफ्टी 42 अंकानी वाढून 22,530 वर बंद झाला.

सेन्सेक्स 75 अंकानी वाढून 73,961 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 301अंकानी वाढून 48,983 वर बंद झाला. निफ्टी स्मॉलकॅप 83.85 अंकानी वाढून16,696 वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप 309 अंकानी वाढला आणि 51,735 च्या पातळीवर बंद झाला. आज शुक्रवारी बाजारात दिसलेली ही वाढ चांगली आहे कारण जेव्हा सोमवारी बाजार उघडेल तेव्हा एक्झिट पोलच्या निकालानंतर बरेच चढ उतार होतील.

Share Market Today
RBI: रिझर्व्ह बँकेने नोटांच्या छपाईवर खर्च केले इतके हजार कोटी; 'या' किमतीच्या सर्वाधिक नोटा बाजारात
Share Market Today
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स वाढले?

बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.01 टक्के वाढ झाली आहे. यानंतर, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

Share Market Today
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्समधील उर्वरित 13 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये नेस्ले इंडियाचे शेअर्स 2.06 टक्क्यांनी घसरले. याशिवाय मारुती सुझुकी, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले.

Share Market Today
RBI: रिझर्व्ह बँक ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने भारतात परत आणणार; 1991 नंतर प्रथमच...
Share Market Today
S&P BSE SENSEXSakal

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.19 लाख कोटी रुपयांची वाढ

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 31 मे रोजी 412.55 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 30 मे गुरुवार रोजी 410.36 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.19 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.19 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com