Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: मंगळवारी (14 मे) बाजार चांगल्या वाढीसह बंद झाले. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली आणि बाजारात स्थिरता परत आल्याचे दिसते.
Share Market Closing
Stock market today Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 14 May 2024: आज मंगळवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 340 अंकांनी वाढून 73104 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 114 अंकांच्या वाढीसह 22218 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारच्या शेअर बाजाराच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसमध्ये पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

तर सिप्लाचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक घसरले. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजात वाढ झाली असून निफ्टी 22,200 च्या वर बंद झाला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या व्यवहारात चांगली वाढ झाली.

Share Market Closing
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या सत्रात बाजारात ऑटो, एनर्जी, बँकिंग, मेटल्स, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप शेअर्सही जोरदार वाढीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market TodaySakal

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. एकूण 3928 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 2698 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 1111 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 114 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Share Market Closing
Cognizant: कॉग्निझंट कंपनीचा धक्कादायक निर्णय! कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न आल्यास जाणार नोकरी; काय आहे प्रकरण?

मंगळवारी शेअर बाजारात बरेच चढ-उतार झाले आणि दिवसभर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई वाढीसह व्यवहार करत होते. दुपारनंतर शेअर बाजाराने आपली तेजी गमावली असली तरी कामकाजाच्या शेवटच्या तासात पुन्हा तेजी दिसून आली.

Share Market Closing
S&P BSE SENSEXSakal

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारात चांगली तेजी असताना निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकांमध्ये थोडीशी घसरण झाली, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.

मंगळवारी शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान टॉप गेनर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंदाल्को यांच्या शेअर्सचा समावेश होता, तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांच्या यादीत सिप्ला, टीसीएस यांचा समावेश होता.

Share Market Closing
Haldiram: तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड लवकरच परदेशी कंपनीच्या हातात जाणार? सर्वात मोठ्या कंपनीने लावली बोली

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.73 लाख कोटी रुपयांची वाढ

शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सर्व शेअर्सचे मार्केट कॅप पुन्हा 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आणि ते 402.14 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. जे मागील सत्रात 397.41 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.73 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.