Share Market Closing: शेअर बाजारात तेजीचा 'चौकार'; सेन्सेक्स 114 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today: बुधवारी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराने तेजी होती. प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 114 अंकांनी वाढून 73,852 वर पोहोचला. निफ्टीनेही 22,400 ची पातळी ओलांडली आहे.
Share Market today Sensex, Nifty 50 settle higher for 4th straight session; broader indices outperform
Share Market today Sensex, Nifty 50 settle higher for 4th straight session; broader indices outperform Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 24 April 2024: बुधवारी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी होती. प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 114 अंकांनी वाढून 73,852 वर पोहोचला. निफ्टीनेही 22,400 ची पातळी ओलांडली आहे. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि आरोग्यसेवा क्षेत्रात झाली. तर आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये विक्री होती.

Share Market Closing
Share Market TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

आजच्या व्यवहारात कंझ्युमर ड्युरेबल्स व्यतिरिक्त बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल, ऊर्जा, आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. तर आयटी, ऑटो, ऑइल अँड गॅस आणि मीडिया शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market TodaySakal

निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक चांगली कामगिरी करत असताना स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे स्मॉल कॅप निर्देशांकातही वाढ दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह तर 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market today Sensex, Nifty 50 settle higher for 4th straight session; broader indices outperform
Tesla Layoff: इलॉन मस्कचा मोठा निर्णय! टेस्लातील 6 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

कोणते शेअर्स वाढले?

शेअर बाजारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये टाटा स्टील 2.73 टक्क्यांनी, पॉवर ग्रिड 1.75 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा बँक 1.64 टक्क्यांनी, अल्ट्राटेक सिमेंट 1.48 टक्क्यांनी, एनटीपीसी 1.25 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 0.94 टक्क्यांनी वाढले आहेत.

बजाज फिनसर्व्ह 0.62 टक्क्यांनी आणि सन फार्मा 0.54 टक्क्यांनी घसरले. टेक महिंद्रा 1.17 टक्के, टीसीएस 1.07 टक्के, इन्फोसिस 0.68 टक्के, रिलायन्स 0.61 टक्के घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
S&P BSE SENSEXSakal
Share Market today Sensex, Nifty 50 settle higher for 4th straight session; broader indices outperform
Reliance Jio: 5G शर्यतीत जिओ बादशहा! जिओ बनले जगातील सर्वात मोठे मोबाइल ऑपरेटर, चायनाला टाकले मागे

मार्केट कॅप 400 लाख कोटींच्या पुढे

शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप पुन्हा 400 लाख कोटी रुपये पार करण्यात यशस्वी झाले आहे.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपन्यांचे मार्केट कॅप 401.47 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 399.68 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 1.79 लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.