Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 400 अंकांनी खाली, कोणत्या क्षेत्रात तेजी?

Stock Market Today: सोमवारी (24 जून) शेअर बाजारात घसरणीचे वातावरण आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे सेन्सेक्स-निफ्टी अर्ध्या टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरून 76,885 वर उघडला
Share Market
Share MarketSakal

Share Market Opening Latest Update 24 June 2024: सोमवारी (24 जून) शेअर बाजारात घसरणीचे वातावरण आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे सेन्सेक्स-निफ्टी अर्ध्या टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरून 76,885 वर उघडला आणि निफ्टीही जवळपास 100 अंकांनी घसरून 23,382 वर उघडला. फार्मा, खाजगी बँक आणि मेटल शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही जवळपास अर्ध्या टक्क्यांनी घसरले. इंडिया VIX 5 टक्क्यांनी वाढला.

सकाळच्या वेळी गिफ्ट निफ्टी 100 हून अधिक अंकांनी घसरत होता आणि अमेरिकन बाजारातही थोड्या घसरणीसह संमिश्र व्यवहार दिसत होता. एफआयआयने शुक्रवारी मोठी विक्री केली होती. आज संसदेचे विशेष पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावरही बाजाराचे लक्ष असेल.

Share Market Opening
Share Market TodaySakal

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारात तेजी असणाऱ्या शेअर्समध्ये GRSC, Titagarh Wagons, Railtel, Suzlon Energy, JK Paper, KSEB आणि Bombay Verma या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

घसरण झालेल्या शेअर्समध्ये मोतीलाल ओसवाल, स्वान, एनर्जी, उज्जीवन SFB, FACT, NALCO, SAIL, RBL बँक या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

Share Market
HDFC Bank: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; UPI व्यवहार केल्यास SMS येणार नाही, काय आहे कारण?
Share Market Opening
Share Market TodaySakal

PSU शेअर्समध्ये मोठी वाढ

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. NHPC, पॉवर ग्रिड, SJVN, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, BEML, भारत डायनॅमिक्स, RITES लिमिटेड, IRCTC, GE शिपिंग, IRFC, वेस्ट कोस्ट पेपर, टॅक्स मेको रेल, रेल विकास निगम, Mazagon डॉक आणि RailTel चे शेअर्स तेजीत आहेत.

तर एनटीपीसी, कोल इंडिया, बीईएल, हिंदुस्तान पेट्रोलियम, एनएमडीसी, कंटेनर कॉर्पोरेशन, गेल आणि वॉर्ड विझार्ड इनोव्हेशन या कंपन्यांच्या शेअर्स घसरले आहेत.

Share Market
BSE SENSEXSakal

निफ्टीचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निफ्टी 23,420 चा अंक भेदण्यात अपयशी ठरला आहे. 23100 ते 22700 हे निफ्टीचे पुढील लक्ष्य असू शकते. जर निफ्टी आठवड्याच्या मध्यभागी वाढला तर तो 23580 ते 23630 या दरम्यान व्यवहार करताना दिसून येईल. 24130 ची पातळी निफ्टीसाठी रेझिस्टन्स आहे.

Share Market
Gautam Adani Birthday: कधी काळी चाळीत राहायचे, आता आहेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अशी आहे गौतम अदानींची संघर्षगाथा

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.04 लाख कोटी रुपयांची घट

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजेच 21 जून 2024 रोजी BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,34,48,667.42 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 24 जून 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,32,44,265.79 कोटी रुपयांवर आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 2,04,401.63 कोटी रुपयांची घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com